शिक्षा

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education results


मुंबई : विद्यार्थी आणि पालक यांच्यासाठी महत्वाची बातमी. (SSC Results) सध्या कोरोनाचा काळ सुरु आहे. दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक विद्यार्थ्यांच्या परीक्षा झालेल्या नाहीत. मात्र, आठवी, नववीतील सरासरी गुणांचे गुणात्मक मार्कानुसार दहावीचा हा निकाल लागणार आहे.(SSC Results 2021)  त्यामुळे निकाल कसा लागणार याची उत्सुकता आहे. आता दहावीच्या निकालाची बातमी हाती आली आहे. दहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. निकालाची तारीख लवकरच जाहीर होणार आहे. गुण नोंदणी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे.

Add Zee News as a Preferred Source

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे दहावीचा निकाल या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. 10वी निकालाची तारीख याच आठवड्यात जाहीर होईल, असे सांगण्यात येत आहे. याला शिक्षण मंडळाकडून दुजोरा देण्यात आला आहे. दरम्यान, दहावीचे गुण नोंदवण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे, असे सांगण्यात आले आहे. 

माध्यमांना मिळालेल्या माहितीनुसार या आठवड्याच्या अखेरीस महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाइटवर दहावी निकालाची (SSC results 2021) घोषणा होण्याची शक्यता आहे. दहावीचा निकाल 15 जुलैपर्यंत लागेल, अशी माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली होती. मात्र, आज निकाल जाहीर होणार नाही तर याच आठवड्यात जाहीर होणार असल्याचे आता शिक्षण मंडळाकडून सांगण्या आले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने (MSBSHSE) लवकरच महाराष्ट्र एसएससी बोर्डाची निकाल तारीख जाहीर करणार आहे. निकाल लागल्यानंतर विद्यार्थी त्यांचे निकाल mahresult.nic.in आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर तपासू शकतात. 

मीडिया रिपोर्टनुसार, दहावीच्या निकालाची तयारी अंतिम टप्प्यावर आहे. यावर्षी महाराष्ट्रातील दहावीच्या परीक्षेसाठी सुमारे 15 लाख विद्यार्थ्यांची नोंदणी केली होती. तथापि, कोविड -19च्या प्रचलित परिस्थितीमुळे महाराष्ट्र सरकारने दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button