महाराष्ट्र

Pune Bharti Vidyapeeth Murder Attempt Case; Two Arrested, CCTV Footage Exposed | पुण्यात दोन…

मित्रासोबत मोबाईलवर गेम खेळत असताना दुचाकीवर आलेल्या टोळक्याने धारदार हत्यारांनी वार करून खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या. यावेळी त्यांचे दोन अल्पवयीन साथीदारही ताब्यात घेण्यात आले.

.

करण शिवाजी जमादार (19, रा. वडगाव बुद्रुक,पुणे) आणि शुभम साधु चव्हाण (19, रा. आंबेगाव बुद्रुक,पुणे) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. तर त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार ही ताब्यात घेण्यात आले. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल खिलारे यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, अमंलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे, अभिनय चौधरी यांनी घटनास्थळावरील सीसीटिव्ही फुटेजची तपासणी केल्यानंतर दोघांची नावे निष्पन्न झाली. याप्रकरणी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. त्यातील दोघे अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. कारवाईत गुन्हे निरीक्षक जितेंद्र कदम, सहायक पोलिस निरीक्षक मिथुन परदेशी, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे यांच्या पथकानेही ही कारवाई केली.

मुलाकडून आईवर धारदार चाकूने वार

विसर्जन सोहळा सुरू असताना कौटुंबिक वादातून मुलाने ८० वर्षीय आईवर चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना शनिवार पेठेतील मेहुणपुरा परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ६५ वर्षीय मुलाला आईचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी अटक केली.

अविनाश पांडुरंग साप्ते (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. कुसुम साप्ते (वय ८०) असे गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ महिलेचे नाव आहे. त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत अविनाश साप्ते यांचा भाचा आशिष अशोक समेळ (वय ४५, रा. मेहुणपुरा, शनिवार पेठ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी अविनाश, त्यांची आई कुसुम आणि फिर्यादी आशिष हे शनिवार पेठेतील मेहुणपुरा भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. संपत्तीवरुन त्यांच्यात वाद सुरू आहे. यापूर्वी त्यांच्यात वाद झाले होते. अविनाश साप्ते ६ सप्टेंबर रोजी रात्री दारू पिऊन घरी आले. त्यांनी आई कुसुम साप्ते यांच्याशी वाद घातला. त्यांचा चेहरा आणि डोक्यावर चाकूने वार केले. मुलाने केलेल्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या. आजीला वाचविण्यासाठी आशिष समेळ यांनी भांडणात मध्यस्थी केली. तेव्हा अविनाश यांनी त्याच्यावर चाकूने वार केलाा. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अविनाश साप्ते यांना अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक एस कारके पुढील तपास करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button