बॉयफ्रेंडला कोब्राच्या ताब्यात देणाऱ्या माहीचं नव रुप समोर, मोलकरणीसोबत… – News18 लोकमत

पवन सिंह कुंवर, प्रतिनिधी हल्द्वानी, 26 जुलै : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील प्रसिद्ध अंकित चौहान हत्याकांड समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. आता या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉली आर्या उर्फ माही सिंग हिला पोलिसांनी अटक केली होती. यानंतर याप्रकरणी आता पोलिसांनी माही सिंग हिची फरार मोलकरीण आणि मोलकरणीचा पती यांना पश्चिम बंगालमधून अटक केली आहे. उषा देवी आणि राम अवतार अशी या आरोपी दाम्पत्याचे नावे आहेत. यानंतर आज बुधवारी सकाळी त्यांना हल्द्वानी येथे आणण्यात आले. यानंतर नैनितालचे एसएसपी पंकज भट्ट यांनी सांगितले की, अंकित चौहान हत्याकांडातील मुख्य आरोपी डॉली आर्य उर्फ माही सिंह हिची मोलकरीण उषा देवी आणि तिचा पती राम अवतार नेपाळ सीमेवरून पश्चिम बंगालला गेले होते. याठिकाणी गेल्यावर ते आपल्या नातेवाईकांसोबत जागा बदलत राहिले. तसेच दोघेही बांगलादेशात पळून जाणार होते. मात्र, त्यापूर्वी नैनिताल पोलिसांनी त्यांचे लोकेशन ट्रेस केले आणि त्यांना अटक केली. दरम्यान, यानंतर या दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले. यानंतर त्यांची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. आता या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे, असेही त्यांनी सांगितले.
News18लोकमत
उषावर माहीचा सर्वात जास्त विश्वास होता. ती माहीच्या घरी झाडू मारण्यापासून स्वयंपाक करण्यापर्यंतची सर्व कामं करायची. तसेच उषाची मुले आणि नवराही जास्तीत जास्त वेळ माहीच्या घरीच राहायचे. पण, अंकितला उषा आणि तिच्या कुटुंबीय हे माहीच्या घरी राहत असल्याचे आवडत नव्हते. माही आणि ऊषा दारुचे व्यसनी – मिळालेल्या माहितीनुसार, माही आणि तिची मोलकरणी उषा या दोघांना दारूचे व्यसन होते. माही अनेकदा उषाच्या घरीही जायची. मात्र, अंकित चौहान यामुळे नाराज व्हायचे. उषा आणि तिचा पती राम अवतार यांनी ज्या शेतात झोपडी बांधली होती, अंकितने त्या शेतमालकाला ती जागा खाली करवून घेण्यास प्रवृत्त केले होते. त्यामुळे मालकाने ते शेत त्यांना खाली करायला लावले. त्यामुळे उषा आणि राम अवतार हे पती पत्नी अंकितवर रागावले होते. याच कारणावरून या दोघांनी या हत्याकांडात भाग घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.