अपराध

शिकवणीला येणाऱ्या मुलींचं व्हायचं ब्रेन वॉश; नगरमधील लव्हजिहाद प्रकरणात खळबळजनक खुलासा – News18…


loveहरीष दिमोटे, प्रतिनिधी अहमदनगर, 29 जुलै : अहमदनगर जिल्ह्यातील उंबरे गावात लव्हजिहाद आणी धर्मांतर करण्यासाठी रॅकेट काम करतंय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुरी तालुक्यातील आणखी 2 अल्पवयीन मुलींनी तक्रार दाखल केली असून चार आरोपींना जेरबंद करण्यात आले आहे. काय आहे प्रकरण? दोन दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून धर्मांतर करण्यास प्रवृत्त करणे आणि विनभंगाच्या तक्रारीनंतर गावातील सामाजिक वातावरण बिघडले होते. परस्पर विरोधी तीन तक्रारी पोलीस ठाण्यात दाखल झाल्यानंतर प्रार्थनास्थळी दहशत निर्माण करणाऱ्या जवळपास 13 आरोपींना जेरबंद करण्यात आलंय. मात्र, हे प्रकरण आणखी गंभीर वळणावर आले असून शिकवणी घेण्याच्या माध्यमातून हिंदू मुलींचे धर्मांतर करण्यास प्रवृत्त केलं जात असल्याची धक्कादायक माहीती समोर आली आहे. या प्रकरणी अगोदर एक गुन्हा दाखल होता. आता आणखी दोन मुलींनी गुन्हा दाखल केला असून शिक्षिकेसह आठ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे तर चार आरोपींना पोलीसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आणखी दोन मुलींनी दिल्या तक्रारी दोन अल्पवयीन मुलींनी समोर येत आम्हाला आम्हाला धर्म बदलण्यासाठी प्रवृत्त केलं जात असल्याचं म्हणटलंय तर बोगस अकाउंट बनवून फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली गेलीय..शिकवणीला जात असलेल्या ठिकाणच्या शेख या शिक्षिकेने आमची त्यांच्या समाजातील मुलांशी ओळख करून देत सेल्फी काढण्यास सांगितले असल्याची फिर्याद दिलीय. तर तुम्ही आमच्या समाजाच्या रितीप्रमाणे वागत जा, टिकली लावत जाऊ नका, बुरखा घालत जा अस वारंवार ही शिक्षिका सांगत असल्याचा आरोप मुलींनी केला आहे. ओळख झालेल्या मुलांकडून सतत आम्हाला तू मला आवडतेस, माझ्याशी लग्न कर असे मेसेज येत होते व नकार दिल्यानंतर मेसेज व्हायरल करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पोलीस ठाण्यात देण्यात आली. फिर्यादी अल्पवयीन मुलीने घडलेली सगळी हकीकत बोलून दाखवलीय. वाचा –
‘भरोसा सेल’मध्ये वाद मिटवायला आलेल्या पतीला पत्नीच्या मामाने भोसकलं
विधान परिषदेत भाजप आमदार प्रसाद लाड यांनी या घटनेबाबत औचित्याचा मुद्दासुद्धा उपस्थित केला होता. पहिल्या प्रकरणातील आरोपीचे नाव निष्पन्न झाल्यानंतर आता याच आरोपींनी अनेक मुलींची फसवणूक केली असल्याच समोर आलं आहे. काल रात्री उशिरा दोन्ही अल्पवयीन मुलींच्या फिर्यादीवरून 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आतापर्यंत तीन मुलींनी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्याने राज्यात धर्मांतर करण्याचे रॅकेट सुरू आहे का? असा सवाल माजी राज्यमंत्री शिवाजी कर्डीले यांनी करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. काल रात्री हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी राहुरी पोलीस ठाण्यात मोठी गर्दी केली होती तर माजी आमदार शिवाजी कर्डीले यांनी सुद्धा पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतली. दोन्ही अल्पवयीन मुलींच्या फिर्यादी नंतर 8 जणांविरुद्ध कलम 354, 354 ( ड ), 109, 34 बालकांचे लैगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम सन 2012 चे कलम 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून शिक्षिकेसह 4 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. हा सगळा प्रकार अनेक दिवसापासून सुरू असून केवळ लव्ह जिहादचा प्रकार असल्याने यापासून लक्ष दूर करण्यासाठी प्रार्थना स्थळाची तोडफोड केल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटनांनी केला आहे. गेल्या अनेक दिवसापासून राज्यात लव्ह जिहादच्या अनेक घटना समोर येत असून आता राहुरी तालुक्यातील या घटनेने पुन्हा एकदा धर्मांतरनाचा मुद्दा समोर आला आहे. नेमका हा सगळा प्रकार काय आहे? यातील सत्य समोर आणण्याची जबाबदारी पोलिसांची असून पोलीस तपासात काय समोर येणार याकडं जिल्ह्याच लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button