Raigad Shiv Sena Shinde NCP Ajit Pawar Bharat Gogawale Political Tension | आता राजकीय फटाके…

राज्यात पुढील काही दिवसांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार असल्यामुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडमध्ये शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट पुन्हा एकदा आमने-सामने आले आहेत. दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आण
.
भरत गोगावले म्हणाले, महाराष्ट्रासह देशभरात आजच्या दिवशी उत्साहाचे वातावरण आहे. गेले आठ दिवस फटाके फूटत होते, परंतु आता राजकीय फटाके फुटायला सुरुवात होणार आहे. जसे जसे उमेदवार डिक्लेअर होतील, त्यावर पुढच्या काही लोकांचे भवितव्य अवलंबून आहे, उमेदवार आणि राजकीय पक्षांचे भवितव्य देखील त्यावरच अवलंबून आहे.
पुढे बोलताना भरत गोगावले म्हणाले, रोहा असेल किंवा दुसरे काही असेल, ही काय कोणाची वैयक्तिक मालमत्ता नाही. आव्हान देत असतील तर काही दिवसांमध्ये त्यांना कळेल. आम्ही वरिष्ठांचा आदेश मानण्याचा प्रयत्न करत आहोत, प्रत्येकाला आपापला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. त्यांनी तो वाढवलाच पाहिजे. आमच्याकडे ज्यांना काही पटत नसेल तर ते त्यांच्याकडे जात असतील, त्यांच्याकडे ज्यांना काही पटत नसेल तर ते आमच्याकडे येतात. काही लोक बीजेपीकडे जात असतील, त्यामुळे कोणीही कोणाला कोणाची वैयक्तिक प्रॉपर्टी मालमत्ता समजू नये, असे म्हणत गोगावले यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
आमच्या नेत्यांकडून आम्हाला महायुतीचा प्रस्ताव आला, तो येत असताना आम्ही दोघे मोठे भाऊ आहोत, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी, कारण तीन-तीन सीट आहेत या जिल्ह्यामध्ये. त्यासाठी आम्हीच पहिला प्रस्ताव ठेवलेला आहे, जर कोणाला काय वेगळे वाटत असेल तर आमचची ती पण तयारी आहे, असा थेट इशाराच यावेळी गोगावले यांनी दिला आहे.
