अपराध

पती कामाला गेला अन् 3 मुलांच्या आईचे अफेअर झाले सुरू, प्रियकराच्या मदतीने सासू-सासऱ्याला केली मारहाण


चित्रकूट, 29 जुलै : यूपीच्या चित्रकूट जिल्ह्यात एका सासू आणि सासऱ्याला त्यांच्या सुनेच्या विवाहबाह्य संबंधाला विरोध करणे भारी पडले. सुनेने तिच्या प्रियकराच्या मदतीने सासू आणि सासऱ्याला बेदम मारहाण केली असून आता सासरच्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलीस कारवाई करत आहेत. संबंधित घटना चित्रकूटच्या मऊ पोलीस स्टेशन हद्दीतील बिहटा गावची आहे. पीडित सासू सासऱ्यांनी असा आरोप केला आहे की, तिचा मुलगा रवींद्र याचे लग्न आठ वर्षांपूर्वी राजापूर येथील गीता हिच्याशी झाले होते. मुलगा रवींद्र आणि सुनेला तीन मुले आहेत, माझा मुलगा नोकरीसाठी दुसऱ्या शहरात गेला असल्याने त्यांच्या सुनेचे एका व्यक्तीशी अवैध संबंध आहेत. पीडित सासूने पुढे सांगितले की, बाहुका गावात राहणाऱ्या नीरज नावाच्या व्यक्तीसोबत गेल्या दोन वर्षांपासून त्यांच्या सुनेचे अफेअर सुरू असून तो उघडपणे आपल्या सुनेला भेटण्यासाठी घरी येतो.

News18लोकमत


News18लोकमत

ही बाब तेव्हा गंभीर झाली जेव्हा दोन दिवसांपूर्वी नीरज सोबत सून गीता गायब झाली होती. मग जेव्हा ती प्रियकरासोबत पुन्हा घरी आली तेव्हा सासरच्यांनी तिच्या अवैध संबंधांना विरोध केला. सासरच्यांनी या दोघांच्या नात्याला विरोध करताच सूनेन प्रियकरासोबत मिळून सासू सासऱ्यांना मारहाण केली.
दार उघडताच घर मालकाला बसला धक्का, समोर बसला होता….
मारहाणीपासून वाचण्यासाठी सासरच्यांनी पोलिसांना फोन केला आणि सूने विरोधात तक्रार केली. यावेळी दोघांचे मेडिकल करण्यात आले परंतु सुने विरोधात रितसर तक्रार दाखल करण्यात आली नाही. उलट पोलिसांनी त्यांनाच शिवीगाळ करून पळवून लावले आहे.  न्याय न मिळाल्याने सासू सासऱ्यांनी आता पोलीस अधीक्षक कार्यालयात येऊन आरोपी सून आणि तिच्या प्रियकरावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button