actor Dhanush not happy with raanjhanaa AI altered ending says it killed the soul of original…

Raanjhanaa Movie Climax Changed by AI : मागील साधारण वर्षभरापासून बरेच चित्रपट पुन:प्रदर्शित करण्यात आले. अनेकांच्याच आवडीच्या चित्रपटांना मोठ्या पडद्यावर पुन्हा पाहताना प्रेक्षकांचा आनंदसुद्धा गगनात मावेनासा झाला. मात्र ‘रांझणा’ पुन:प्रदर्शित झाल्यावर मात्र या चित्रपटात मध्यवर्ती भूमिकेत झळकेला अभिनेता धनुष चांगलाच नाराज असल्याचं पाहायला मिळालं.
धनुष स्पष्टपणे काय म्हणाला एकदा पाहाच
AI अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मदतीनं चित्रपटाचा शेवट बदलण्यात आल्याचं पाहून धनुषला विश्वासत बसेना. ज्यामुळं त्यानं सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. चित्रपटाच्या प्रेमापोटी…. असं कॅप्शन देत त्यानं एक पत्रक जारी केलं. ज्यामध्ये लिहिलेलं, ‘AI च्या वापरातून शेवट बदललेला आणि पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला आलेला रांझणा पाहून मी विचलित झालो. या शेवटानं चित्रपटाचा आत्माच हिरावला असून माझा विरोध असतानाही समोरील मंडळींनी हा शेवट दाखवला आहे. 12 वर्षांपूर्वी मी सर्वस्व दिलेला हा तो रांझणा नाहीच आहे.
चित्रपटासाठी होणारा AI चा वापर हा कला आणि कलाकारांसाठी एक चिंतेचा विषय ठरत आहे. कथाकथनाची अखंडता यामुळं लोप पावत असून, सिनेमा क्षेत्राची परंपरासुद्धा धोक्यात आणत आहे.’
आपण अशी आशा करतो की, यासंदर्भात कठोरातील कठोर नियम लागू करत भविष्यात हे प्रकार थांबवण्यात आले पाहिजेत असा सूर आळवत धनुषनं चित्रपटाच्या अखेरच्या दृश्याशी झालेली हेळसांड खपवून घेतली जाणार नसल्याचच स्पष्ट केलं.
For the love of cinema pic.twitter.com/VfwxMAdfoM
— Dhanush (@dhanushkraja) August 3, 2025
चित्रपटात नेमके काय बदल करण्यात आले?
‘रांझणा’च्या AI जनरेटेड नव्या वर्जनमध्ये 2013 प्रमाणं धनुषनं साकारलेलं ‘कुंदन’ हे पात्र मृत्यूमुखी पडत नाही, तर तो त्याचे डोळे पुन्हा उघडतो आणि उठून बसतो आणि त्याला पाहून बिंदिया (स्वरा भास्कर) आणि मुरारी (मोहम्मद जीशान अय्यूब) यांना आनंदाश्रू अनावर होतात असं दाखवण्यात आलं आहे. ज्यानंतर तिथं जोया (सोनम कपूर) सुद्धा पोहोचते आणि तिलाही आनंद अनावर होतो असं व्हायरल होणाऱ्या चित्रपटगृहातील एका व्हिडीओत पाहायला मिळत आहे.
FAQ
1. रांझणा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यावर कोणता बदल करण्यात आला आहे?
रांझणा चित्रपटाच्या AI जनरेटेड नव्या वर्जनमध्ये, 2013 च्या मूळ चित्रपटाप्रमाणे कुंदन (धनुष) हे पात्र मृत्यूमुखी पडत नाही. त्याऐवजी तो डोळे उघडतो, उठून बसतो, आणि त्याला पाहून बिंदिया (स्वरा भास्कर) आणि मुरारी (मोहम्मद जीशान अय्यूब) जोया (सोनम कपूर) यांना आनंदाश्रू अनावर होतात.
2. धनुषने या बदलाबद्दल काय प्रतिक्रिया दिली आहे?
धनुषने AI च्या वापराने चित्रपटाचा शेवट बदलल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्याने सोशल मीडियावर एक पत्रक जारी करत म्हटले की, या बदलाने चित्रपटाचा आत्माच हिरावला आहे.
3. रांझणा चित्रपटाच्या नव्या क्लायमॅक्सचा व्हिडीओ कुठे पाहायला मिळाला?
चित्रपटगृहात रेकॉर्ड केलेल्या एका व्हिडीओद्वारे हा AI ने बदललेला नवीन क्लायमॅक्स व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये कुंदन जिवंत होताना आणि इतर पात्रांना आनंद होताना दाखवले आहे.