वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे मुलाला दिली नोकरी; त्याने मालकालाच 35 लाखांना गंडवलं, छ….

अविनाश कानडजे, छत्रपती संभाजीनगर 29 जुलै : आजकालच्या जगात प्रामाणिक लोक फारच कमी भेटतात, असं म्हटलं जातं. अनेकदा या गोष्टीचा प्रत्ययही येतो. आजकाल कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं शक्य नाही. मग ती व्यक्ती तुमच्या कितीही जवळची असो. पैशासाठी काही लोक कोणत्याही थराला जाण्यास तयार असतात. याचाच प्रत्यय देणारी एक घटना आता छत्रपती संभाजीनगरमधून समोर आली आहे. या घटनेत वडिलांच्या प्रामाणिकपणामुळे त्यांच्या मालकाने मुलालाही कामावर ठेवलं. विश्वासाने बँक व्यवहार, पासवर्ड, कार्डची जबाबदारी दिली. मात्र तरीही ऋषिकेश रतन करपे याने सुरेश रणछोडदास वैष्णव यांची फसवणूक केली. त्याने वैष्णव यांना तब्बल 35 लाखांना फसवलं. गेल्या पाच महिन्यांपासून तो फरार झाला आहे. तरीही कुटुंबाने त्याच्या बेपत्ता झाल्याची साधी तक्रारही दिली नाही.
Palghar Rain Update : मृत्यूनंतरही मरण यातना! चिता जळत असतानाच आला पूर, पुढे घडलं भयानक; पालघरमधील घटना
विष्णू यांच्या तक्रारीवरून वेदांत नगर पोलीस ठाण्यात त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैष्णव यांचा रियल इस्टेट ब्रोकरसह सौंदर्यप्रसाधने गिफ्ट शॉपीचा व्यवसाय आहे. आरोपी ऋषिकेशची वडील त्यांच्याकडे कामाला होते. ते अतिशय प्रामाणिकपणे काम करत असत. मात्र त्यांचं आजारपण वाढल्यामुळे रणछोडदास यांनी त्यांच्या मुलाला कामावर ठेवलं होतं. मात्र त्यांच्या मुलाने मोठा विश्वासघात केला. तरुणाने सापडलेले पैसे केले परत – छत्रपती संभाजीनगरमधून नुकतीच एक मन जिंकणारी घटनाही समोर आली होती. जिल्ह्यातील पैठण तालुक्याच्या बिडकिन येथे ही घटना घडली. यात वडापाव सेंटर येथे कोणीतरी व्यक्ती आपले पैसे विसरून गेला होता. कामाच्या घाईगडबडीत कोणीतरी विसरून गेलेले बँकेतून काढलेले 1 लाख 92 हजार रूपये पिशवीत बेवारस अवस्थेत पडून होते. ही बाब एका ग्राहकाच्या लक्ष आली. त्यानंतर या ग्राहकाने लगेचच वडापाव सेंटरच्या मालकाला याबद्दल सांगितलं. या दोघांनी मिळून मूळ मालकाचा शोध घेतला आणि त्याचे पैसे त्याला परत केले
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :