अपराध

लग्नानंतर आकाश निघाला मुन्ना, तरुणीसोबत केला हादरवणारा प्रकार, नेमकं काय घडलं?


चितरंजन सिंह, प्रतिनिधी बरेली, 28 जुलै : देशात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून खून, आत्महत्या, तसेच बलात्काराच्याही घटना समोर येत आहेत. त्यातच आता आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेश राज्यातील बरेली जिल्ह्यात लव्ह जिहादची घटना समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी एका दलित हिंदू तरुणीला एका विशिष्ट समाजातील तरुणाने नाव बदलून फसवले. त्याने आपले नाव मुन्ना नसून आकाश असल्याचे सांगत तिला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तसेच तिच्याशी शारिरीक संबंधही ठेवले. यानंतर ही तरुणी गर्भवती झाल्यावर तिचा गर्भपात केला. तसेच जेव्हा तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला तर त्याने लग्नही केले.


News18लोकमत

मात्र, काही दिवसानंतर तरुणी पुन्हा गर्भवती झाली आणि तिने एका मुलाला जन्म दिला. यानंतर मुलाला जन्म दिल्यावर आरोपी तरुण तिच्यावर धर्मांतरणासाठी दबाव बनवू लागला. तसेच तिला नमाज पढायला आणि गोमांस खाण्यासाठी दबाव टाकू लागला. मात्र, जेव्हा या तरुणीने या सर्व गोष्टींना नकार दिला तर आरोपी तरुणाने मुलासह तुला मारुन टाकेन अशी धमकी दिली. यानंतर युवतीने बरेली येथील एसएसपी यांना तक्रार केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बरेली जिल्ह्याच्या बिथरी चैनपुर परिसराच्या रामगंगा नगर येथील तरुणीने याप्रकरणी आरोप केला. तिने म्हटले आहे की, ती दलित आहे आणि मागील 2 वर्षांपूर्वी तिची एका तरुणाशी ओळख झाली होती. हा तरुण घोटिया येथील रहिवासी आहे. त्याने आपले नाव आकाश असल्याचे सांगत माझ्यासोबत मैत्री केली होती. यानंतर मैत्रीच्या 8 महिन्यांनी त्याने तिला लग्नाचे आमिष देत तिच्याशी शारिरीक संबंध ठेवले. त्यावेळी तिचे वय 17 होते. यादरम्यान, त्याने तिच्यासोबत अनेकदा शारिरीक संबंध ठेवले. यामुळे ती गर्भवती झाली. ही बाब त्याला माहिती झाल्यावर त्याने तिचा गर्भपात केला. तसेच आरोपीने तिची फसवणूक करुन तिच्याशी लग्न करुन टाकले. लग्नानंतर त्याने आपल्या पत्नीचे खूप शोषण करत तिला मारहाण केली. यादरम्यान, तिने एका मुलाला जन्म दिला. पण तिला तो पुजा करण्यावरही बंधने घालू लागला आणि नमाज पढण्यासाठी दबाव टाकू लागला. इतकेच नव्हे तर गाईचे मांसही त्याने घरात अनेकदा आणले आणि तिला बळजबरीने खायला सांगितले. मात्र, तिने या सर्व बाबींना नकार दिल्यावर तिला तिच्या मुलासह जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. पीडितेने सर्वात आधी स्थानिक पोलीस ठाण्यात याप्रकरणी तक्रार केली. मात्र, अनेकदा सांगूनही काहीच कारवाई केली नाही. यानंतर पीडित तरुणीने रायबरेलीचे एसएसपी प्रभाकर चौधरी यांच्याकडे न्याय मिळावा, अशी मागणी केली आहे. यानंतर त्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button