87 वर्षांच्या धर्मेंद्रचा 15 वर्षांनी लहान शबाना आझमीबरोबर लिपलॉक! थिएटरमध्ये प्रेक्षकांना बसला…

मुंबई, 29 जुलै : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्ट यांचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. रिलीजच्या काही दिवसांत थिएटरमध्ये प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळतेय. सिनेमात अभिनेता रणवीर सिंह आणि आलिया भट्ट यांची जबरदस्त केमिस्ट्री पाहायला मिळतेय. केवळ आलिया रणवीर नाही ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र देखील प्रेक्षकांनी मनं जिंकताना दिसत आहेत. धर्मेंद्र आणि अभिनेत्री शबाना आझमी यांची केमिस्ट्री देखील सिनेमात पाहायला मिळतेय. धर्मेंद्र आणि शबाना यांचा लिपलॉक सीन पाहून प्रेक्षक हैराण झालेत. सोशल मीडियावर दोघांच्या लिपलॉकची चांगलीच चर्चा रंगली आहे. अभिनेते धर्मेंद्र हे वयाच्या 87व्या वर्षी सिनेमात काम करत आहेत यासाठी त्यांचं करावं तितकं कौतुक कमी आहे. तर सिनेमात अभिनेत्री जया बच्चन देखील आहे. जया बच्चन यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नीची भुमिका साकारली आहे. जया बच्चनबरोबर लग्न केल्याच्या अनेक वर्षांनंतर धर्मेंद्र शबाना यांच्यावर प्रेम करत असतात. त्यामुळे दोघे नवरा बायको असून एकाच घरात परक्या प्रमाणे राहत आहेत असं सिनेमात दाखवण्यात आलं आहे. हेही वाचा –
आधी केली 3 लग्न; आत 37 वर्षांनी छोट्या सिंगरबरोबर करतोय रोमान्स; वादात सापडला होता भजन सम्राट अनूप जलोटा
रॉकी और रानी की प्रेम कहानी या सिनेमात दुरावलेल्या धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांची लव्ह स्टोरी पुन्हा सुरू करण्यासाठी आलिया आणि रणवीर प्रयत्न करत असतात. अशातच सिनेमात धर्मेंद्र आणि शबाना यांचा एक लिपलॉक किसिंगचा सीन समोर येतो आणि थिएटरमध्ये बसलेला पब्लिक चांगलंच शॉक होतो. दोघांनी या वयात लिपलॉक सीन फार उत्तमरित्या दिला आहे. पण सोशल मीडियावर मात्र याची चांगलीच चर्चा रंगली आहे.
News18लोकमत
शबाना आणि धर्मेंद्र यांच्या लिपलॉक सीनविषयी ट्विटरवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. धर्मेंद्र आणि शबाना आझमी यांच्यात लिपलॉक सीन असेल याची अजिबात कल्पना नव्हती, असं अनेकांनी म्हटलं आहे.
Dharmendra and shabana ji liplock was something no one expected and was shocked #RockyAurRaniKiiPremKahaani
— 𝚂𝚞𝚖𝚒𝚝 (@lazy_being_) July 28, 2023
रॉकी और रानी की प्रेम कहानीच्या निमित्तान जया बच्चन, धर्मेंद्र आणि शाबाना आझमी हे जुने कलाकार पुन्हा एकदा एकत्र एकाच स्क्रिनवर प्रेक्षकांना पाहायला मिळाले. याविषयी अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :