‘त्या क्षणी त्याच्या कानाखाली…’ पत्नी मरणाच्या दारात असताना चाहत्याची ती मागणी ऐकून संतापलेला…

मुंबई, 28 जुलै : मनोरंजनविश्वातील अभिनेते दुहेरी जीवन जगतात. ते पडद्यावर वेगवेगळी पात्र साकारत असले तरी वास्तविक जीवनात ते त्यांच्यापेक्षा खूप वेगळे असतात. या कलाकारांनी नेहमीच हसत खेळत सामोरं जावं असंच नेहमी चाहत्यांना वाटतं. पण नेहमीच असं घडत नाही. नुकतंच बॉलिवूडचे विनोदी अभिनेते सतीश शाह यांनी त्याच्यासोबत घडलेला धक्कादायक प्रसंगाचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेत्यांपैकी एक म्हणजे सतीश शाह आहेत. हे अभिनेते आजही ‘जाने भी दो यारो (1983), ‘ये जो है जिंदगी (1984)’, ‘हम साथ साथ है’(1999), ‘साराभाई व्हर्सेस साराभाई (2004)’, ‘मैं ‘हूं ना’ (2004), कल हो ना हो (2003), फना (2006) आणि ओम शांती ओम (2007) यांसारख्या चित्रपटांमधील त्याच्या कॉमिक भूमिकांसाठी ओळखले जातात. त्यांच्या विनोदाने आजही प्रेक्षक खळखळून हसतात. पण त्यांच्या याच गुणामुळे अभिनेत्याची पत्नी दवाखान्यात असताना त्याच्या चाहत्याने त्याच्याकडे एक अजब मागणी केली होती ज्यामुळे सतीश शाह चांगलेच संतापले होते.
News18लोकमत
नुकतंच सीएनएन न्यूज 18 ला दिलेल्या मुलाखतीत सतीश शाह यांनी हा खुलासा केला आहे. अभिनेता सतीश शाहने त्यांना एका चाहत्याला जोरात कानाखाली मारायची इच्छा झाली होती, पण त्यामागचं कारणही तसंच होतं.’ असा खुलासा केला आहे. याबद्दलचा एक किस्सा सांगत ते म्हणाले, ‘‘भारतातील प्रेक्षक एक स्वतंत्र व्यक्ती आणि कलाकार यांच्यात फरक करू शकत नाहीत. कुठल्याही क्षणी तुम्ही विनोदीच असावं अशी अपेक्षा ते करतात. मग परिस्थिती काहीही असो.’’ Sushmita Sen : ‘मी ठीक आहे पण…’ चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच सुष्मिता सेनने दिली मोठी हेल्थ अपडेट याबद्दलच बोलताना अभिनेता पुढे म्हणाला, ‘‘एकदा माझी पत्नी खूपच आजारी होती, ती जवळजवळ मरणाच्या दारात उभी होती. त्यावेळी मी खूप तणावात होतो. आमच्या लग्नाला नुकतेच तीन महीने पूर्ण झाले होते. मी त्यावेळी बाहेर बसलो होतो, डोक्यात वेगळे विचार आणि चिंता होती. तेवढ्यात एक माणूस माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला की काय तुम्ही एवढे गंभीर चेहेरा घेऊन बसलायत, एखादा विनोद सांगा.’’ त्यावेळी त्या माणसाला एक कानाखाली मारावी अशी इच्छा सतीश यांच्या मनात होती. याबद्दल बोलताना त्यांनी, ‘‘त्यावेळी मी स्वतःवर खूप नियंत्रण ठेवलं आणि तिथून निघून गेलो, पण ही गोष्ट कलाकारांसोबत नेहमीच घडत असतेच’’ असं म्हटलं आहे. सतीश हे बऱ्याच दिवसांपासून मनोरंजन क्षेत्रापासून दूर असून त्यांनी ब्रेक घेतला आहे. याविषयीचं कारण सांगताना त्यांनी , ‘मला माहित नाही, मला करावंसं वाटलं तर करेन. मी फक्त पैशासाठी चित्रपट करु शकत नाही. जेव्हा मला आतून प्रेरणा मिळेल तेव्हाच मी चित्रपट करेन. माझा शेवटचा चित्रपट ‘हमशकल्स (2014)’ केल्यानंतर कदाचित मी आतून नाराज झालोय.’ असा खुलासा केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.