मनोरंजन

गौरीसोबत लग्नासाठी शाहरुखने ठेवलेलं ‘हे’ हिंदू नाव; कारण वाचून वाटेल आश्चर्य – News18 लोकमत

मुंबई, 27 जुलै : बॉलिवूड किंग खान म्हणजे अर्थातच अभिनेता शाहरुख खान आपल्या अभिनयाने करोडोच्या मनावर राज्य करतो. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. किंग खान म्हणून प्रसिद्ध असलेला शाहरुख देशातच नाही तर परदेशातही खूप लोकप्रिय आहे. शाहरुख आणि त्याची पत्नी गौरी हे बॉलिवूडमधील सर्वात क्यूट कपलपैकी एक मानले जाते. दोघेही आजवर सुखाचा संसार करत असून त्यांच्या लव्हस्टोरी पासून कित्येक चाहत्यांना मिळते. परंतु तुम्हाला माहित आहे का की गौरीसोबत लग्न करण्यासाठी शाहरुखला खूप संघर्ष करावा लागला होता. खूप संकटं झेलून दोघांनी लग्नगाठ बांधली होती. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की शाहरुख खानने गौरीसोबत लग्न करण्यासाठी स्वतःच नाव देखील बदललं होतं. त्याच्या मागचं कारण खूपच मजेशीर आहे. गौरीसोबत लग्न करण्याआधी शाहरुखनं आपलं नाव बदलून जितेंद्र कुमार तुली असं ठेवलं होतं. हे नाव ठेवण्यामागचं कारणही खूप खास होतं. Manit Joura: प्रसिद्ध अभिनेत्यानं ग्रीक गर्लफ्रेंडशी गुपचूप बांधली लग्नगाठ; चाहत्यांना आश्चर्याचा धक्का शाहरुख खानच्या आजीला तो जितेंद्र आणि राजेंद्र कुमारसारखा दिसतो असं वाटायचं. मुश्ताक शेख यांच्या पुस्तकात याविषयीचा किस्सा सांगण्यात आला आहे. या पुस्तकात, ‘शाहरुखने या दोन्ही स्टार्सना श्रद्धांजली म्हणून  जितेंद्र कुमार तुली हे नाव ठेवलं होतं.’ असा खुलासा करण्यात आला आहे. तर गौरीनेही लग्नासाठी मुस्लिम नाव निवडले होते. या जोडप्याने कोर्ट मॅरेजही केल्याचे फार कमी लोकांना माहिती आहे. हा एक आंतरधर्मीय विवाह होता. पण वेगळ्या धर्मामुळे या दोघांत कधीही भांडण झालं नाही.  या दोघांनी आपल्या मुलांचं संगोपन अत्यंत धर्मनिरपेक्ष पद्धतीने केलं आहे.

News18लोकमत

एवढंच नाही तर गौरीने देखील शाहरुखची ओळख तिच्या कुटुंबियांना अभिनव या नावाने करून दिली होती.  मुश्ताक शेख यांच्या पुस्तकात ‘गौरीचे आईवडील या दोघांच्या लग्नाच्या विरोधात होते, म्हणून पालकांचा होकार मिळवण्यासाठी गौरीने शाहरुखचं नाव घरच्यांना अभिनव असं सांगितलं होतं.’  असा खुलासा केला होता. गौरीच्या पालकांच्या या लग्नाला शाहरुखच्या वेगळ्या धर्मामुळेच विरोध नव्हता तर त्यामागे इतरही अनेक कारणे होती. त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला तेव्हा दोघेही खूप तरुण होते. लग्नाच्या वेळी गौरी फक्त 21 वर्षांची होती तर शाहरुख 26 वर्षांचा होता. तसेच, त्याचं करिअर सुद्धा सुरु झालं नव्हतं. पण दोघांनी वाईट स्थितीतही एकमेकांना साथ दिली.

तेव्हा परिस्थिती इतकी बिघडली होती की, गौरीच्या आईने मूठभर झोपेच्या गोळ्या गिळत आत्महत्येचा प्रयत्न देखील केला होता. पण त्या यातून चमत्कारिकरित्या वाचल्या. त्यानंतर शाहरुखचे त्यांच्या मुलीवर असलेले प्रेम लक्षात घेऊन गौरीच्या पालकांनी हार मान्य केली आणि लग्नाला होकार दिला. दोघांनी कोर्टात लग्नगाठ  बांधली  होती.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button