मनोरंजन

Manit Joura: प्रसिद्ध अभिनेत्यानं ग्रीक गर्लफ्रेंडशी गुपचूप बांधली लग्नगाठ; चाहत्यांना…

 

मुंबई, 27 जुलै : छोट्या पडद्यावरील अनेक अभिनेते घराघरात लोकप्रिय असतात. विविध मालिकांमधून दररोज प्रेक्षकांच्या भेटीला येणाऱ्या या कलाकारांविषयी जाणून घ्यायला चाहते कायम उत्सुक असतात. आता छोट्या पडद्यावरील एका लोकप्रिय मालिकेतील अभिनेत्याबद्दल मोठी बातमी समोर येत आहे. टीव्हीवरील प्रसिद्ध मालिका ‘कुंडली भाग्य’ मध्ये ऋषभची भूमिका करणारा अभिनेता मनितने गुपचूप लग्न केलं आहे. अभिनेत्याने त्याची गर्लफ्रेंड अँड्रिया पनागिओटोपोलु हिच्याशी लग्नगाठ बांधली आहे. लग्नाचा खुलासा करत अभिनेत्याने चाहत्यांना मोठा धक्काच दिला आहे. 9 जुलै रोजी मनितने त्याची ग्रीक जोडीदार अँड्रिया पनागिओटोपोलोशी गुपचूप लग्न केले. अँड्रिया पेशाने डान्स टीचर आहे. मनितने आपल्या गर्लफ्रेंडसोबत अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये होता. अखेर आपल्या नात्याला पुढे नेत त्याने अँड्रिया सोबत लग्नगाठ बांधली आहे. ‘नागिन 6’ फेम अभिनेत्याने नुकताच लग्नाविषयी खुलासा केला आहे.

मीडियाशी बोलताना मनित म्हणाला, ‘मला इथेच लग्न करायचं आहे हे मला स्पष्ट होतं. लग्नाच्या दिवशी पाऊस पडत होता. पण मुसळधार पाऊस असला तरी  लग्न व्यवस्थित पार पडले. एक खूपच खास गोष्ट म्हणजे लग्नात मनितने त्याच्या पूर्वजांची 108 वर्षे जुनी तलवार घेतली होती.  या तलवारीवर कुटुंबातील पुरुषांची नावे छापलेली होती, असा खुलासाही मनितने केला. दरम्यान, मनीतची पत्नी अँड्रिया डान्स टीचर आहे. मनित आणि अँड्रिया १० वर्षांपूर्वी विद्यार्थी आणि शिक्षक म्हणून भेटले होते. ते आधी एकमेकांचे चांगले मित्र होते. २०१९ मध्ये एकदा दोघांनीही एकमेकांना आपल्या  मनातील भावना सांगितल्या. याविषयी बोलताना मनित म्हणाला, ‘‘आम्ही खूप चांगले मित्र होतो. ती मला खूप चांगलं ओळखत होती. मी तिला सर्वात आधी मुंबई एअरपोर्टवर प्रपोज केलं होतं, कारण आम्ही पहिल्यांदा तिथंच भेटलो होतो.’’ दरम्यान, जानेवारी महिन्यात मनितने अँड्रियाला अतिशय फिल्मी पद्धतीने प्रपोज केलं होतं. आता दोघांनी एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. लग्नात मनित व अँड्रिया फारच सुंदर दिसत आहेत. त्यांच्या लग्नाला धीरज धूपर व श्रद्धा आर्या पोहोचले होते. त्यांनी मनितच्या लग्नात डान्स केला होता. मनित जौरा यांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर, तो ‘मुझसे कुछ कहती ये खामोशियां’ या टीव्ही मालिकेत गर्व शिंदेच्या भूमिकेत दिसला होता. तो ‘सुपरकॉप्स व्हर्सेस सुपरव्हिलेन्स’, ‘प्रेम बंधन’, ‘कुंडली भाग्य’ आणि ‘नागिन’ सारख्या टेलिव्हिजन शोचा देखील भाग आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button