स्वास्थ्य

Mental Health Doomscrolling is a disease caused by mobile phones know symptoms | मोबाईल ठरतोय…


Doomscrolling disease: भारत हा जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया वापरकर्ता देश बनलाय. डाटा रिपोर्टल (2025) नुसार, भारतात 82 कोटींहून अधिक लोक इंटरनेट वापरतात, त्यापैकी 47 कोटी सक्रिय सोशल मीडिया यूजर्स आहेत. एका सरासरी भारतीय व्यक्ती दररोज 2.7 तास सोशल मीडिया वापरते. यामुळे डूमस्क्रॉलिंग ही भारतात एक नवीन मानसिक आरोग्य आव्हान बनली आहे. डूमस्क्रॉलिंग म्हणजे नेमकं काय? हा आजार कोणाला जडतो? यावर उपाय काय? सविस्तर जाणून घेऊया. 

Add Zee News as a Preferred Source

विशेषतः 18 ते 24 वयोगटातील तरुण  सर्वाधिक मोबाईलमध्ये इंटरनेटच्या विश्वात गुंतलेले आहेत.  36% भारतीय किशोरवयीन मुलांना सोशल मीडियामुळे तणाव आणि चिंता जाणवते, असे आयआयटी मुंबई आणि एनआयएमएचएएनएसच्या संयुक्त अहवालात म्हटलंय. 

डूमस्क्रॉलिंग म्हणजे नेमकं काय?

डूमस्क्रॉलिंग म्हणजे सोशल मीडिया किंवा न्यूज प्लॅटफॉर्मवर सातत्याने नकारात्मक बातम्या, चित्रे किंवा माहिती पाहण्याची सवय. नॅशनल जिओग्राफिकच्या अहवालानुसार, नकारात्मक बातम्या आणि हिंसक फोटो यामुळे व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर खोल परिणाम होतो. यामुळे मेंदूचा ‘अ‍ॅमिग्डाला’ हा भाग अति-सक्रिय होतो, जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो. परिणामी, व्यक्ती सतत धोक्याच्या भावनेत राहते, ज्यामुळे तणाव आणि चिंता वाढते, असे तज्ञ सांगतात.

मानसिक आरोग्यावर कसा होतोय परिणाम?

डूमस्क्रॉलिंगमुळे मेंदूच्या न्यूरल सर्किट्समध्ये बदल होतात. यामुळे मेंदू नकारात्मक माहितीवर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागते. याचा परिणाम म्हणून चिंता, नैराश्य, झोपेची अनियमितता आणि सामाजिक संबंधांपासून दुरावणे यासारख्या समस्या उद्भवतात. सतत तणावामुळे व्यक्तीच्या निर्णयक्षमतेत आणि एकाग्रतेत घट होते. यामुळे दैनंदिन जीवनावरही विपरीत परिणाम होतो.

शारीरिक नुकसान कसं होतं?

मोबाईल फोनमधून निघणारी ब्लू लाइट आणि सतत सोशल मीडिया वापर यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्य धोक्यात येते. ब्लू लाइटमुळे डोळ्यांचा ताण, झोपेची कमतरता आणि डोकेदुखी वाढते. तसेच, नकारात्मक बातम्यांमुळे तणाव आणि नैराश्याचा धोका वाढतो. विशेषतः तरुणांमध्ये डूमस्क्रॉलिंगमुळे मानसिक अस्थिरता आणि सामाजिक दुराव्याची समस्या वाढत आहे.

डूमस्क्रॉलिंगपासून बचाव कसा करावा?

डूमस्क्रॉलिंगपासून वाचण्यासाठी डिजिटल डिटॉक्स आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात. यामध्ये स्क्रीन टाइम मर्यादित करणे, झोपण्यापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहणे, वाचन, ध्यान किंवा व्यायाम यावर लक्ष केंद्रित करणे आणि नियमित झोपेच्या सवयी सुधारणे अशा गोष्टी करायला हव्यात. तरच तुमचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारण्यास मदत होईल,असे तज्ज्ञ सांगतात. 

FAQ

डूमस्क्रॉलिंग म्हणजे नेमके काय आणि ते कसे ओळखावे?

उत्तर: डूमस्क्रॉलिंग ही सोशल मीडिया किंवा न्यूज प्लॅटफॉर्मवर सातत्याने नकारात्मक बातम्या, हिंसक प्रतिमा किंवा तणावपूर्ण माहिती पाहण्याची सवय आहे. यामध्ये व्यक्ती नकळत घंटों नकारात्मक कंटेंट पाहत राहते, ज्यामुळे तणाव, चिंता किंवा अस्वस्थता वाढते. जर तुम्ही सोशल मीडियावर जास्त वेळ घालवत असाल, विशेषतः नकारात्मक बातम्या पाहण्यात, आणि त्यानंतर अस्वस्थ किंवा उदास वाटत असेल, तर ही डूमस्क्रॉलिंगची लक्षणे असू शकतात.

डूमस्क्रॉलिंगमुळे मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतात?

उत्तर: डूमस्क्रॉलिंगमुळे मेंदूचा अ‍ॅमिग्डाला हा भाग अति-सक्रिय होतो, जो भीती आणि तणाव नियंत्रित करतो. यामुळे चिंता, नैराश्य, झोपेची अनियमितता आणि सामाजिक दुरावा यासारख्या समस्या उद्भवतात. मेंदू नकारात्मक माहितीवर जास्त लक्ष केंद्रित करू लागतो, तर सकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ शकते. यामुळे निर्णयक्षमता आणि एकाग्रता कमी होऊन दैनंदिन जीवनावर विपरीत परिणाम होतो.

डूमस्क्रॉलिंगपासून बचाव करण्यासाठी काय करता येईल?

उत्तर: डूमस्क्रॉलिंग टाळण्यासाठी डिजिटल डिटॉक्स महत्त्वाचे आहे. स्क्रीन टाइम मर्यादित करा, झोपण्यापूर्वी सोशल मीडियापासून दूर राहा, आणि सकारात्मक गतिविधींवर लक्ष केंद्रित करा, जसे की वाचन, ध्यान, व्यायाम किंवा कला. नियमित झोपेच्या सवयी आणि निरोगी जीवनशैली अवलंबल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारू शकते. तसेच, नकारात्मक बातम्यांपासून स्वतःला वेळोवेळी दूर ठेवणे आवश्यक आहे.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button