मनोरंजन

‘अण्णांच्यावर अंत्यसंस्कार करून घरी आलो आणि…’ जयंत सावरकरांच्या निधनानंतर मिलिंद गवळींची…


**मुंबई, 25 जुलै-**सोमवारी ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचं निधन झालं. जयंत सावरकर 88 वर्षांचे होते. जयंत सावरकर यांच्या निधनानंतर आई कुठे काय करते मधील अनिरुद्ध म्हणजेच मिलिंद गवळी यांनी एक भावुक पोस्ट शेअर केली आहे. यापूर्वीही त्यांनी जयंत सावरकर यांच्याविषयी एक पोस्ट शेअर केली होती. जयंत सावरकर यांचे काम या वयातही सुरूच होते, अनेक कलाकारांनी त्यांच्याविषयी काही आठवणी शेअर केल्या आहेत. जयंत सावरकर त्यांच्या हेल्थविषयी खूपच जागरूक होते. मिलिंद गवळी देखील त्यांच्या हेल्थविषयी नेहमीच जागरूक दिसतात. मिलिंद गवळी यांनी देखील आण्णांच्या याच गोष्टीचं कौतुक करत काही आठणींना उजाळा दिला आहे. मिलिंद गवळी यांनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे की, “असं जगता आलं पाहिजे”अण्णांसारखा ( जयंत सावरकरांसारखा ) , माणसाला मिळालेलं हे सुंदर आयुष्य माणसाने कसं छान जगावं हे अण्णां आपल्याला शिकवून गेले,आपल्या कामावर, आपल्या कलेवर असं प्रेम करावं, सातत्याने, वर्षानुवर्ष, मन लावून, अगदी श्रद्धेने कला कशी जोपासावी हे अण्णांकडूनच आपण शिकलं पाहिजे, 1984 सालापासून ची आमची ओळख,गोविंद सराया यांच्या “वक्ते से पहिले” मध्ये पहिल्यांदा आम्ही एकत्र काम केले, त्यानंतर १९९४-९५ मध्ये मनोहर सररवणकरांच्या “दैव जाणिले कुणी” या दूरदर्शन च्या टेलीफिल्म आम्ही बापलेकाची भूमिका केली त्यानंतर एकदम 2022-23मध्ये “आई कुठे काय करते” मध्ये काम केलं. वाचा-
Shirish Kanekar : ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन
म्हणजे तब्बल 38 वर्षा मी अण्णांना माणूस म्हणून आणि एक कलाकार म्हणून ओळखतो ,आता वयाच्या 86-87वर्षाचे अण्णा “आई कुठे काय करते” च्या सेटवर, यायचे अगदी “वेळेवर” call time च्या अर्धा तास आधी. अगदी छान तयार होऊन , एखादा छानसा कुडता घालून त्याच्यावर छानस जॅकेट आणि Hat असायची, मग वेळ न घालवता मेकअप करून, costume घालून, स्वतःच धोतर छानस नेसून, एकदम रेडी व्हायचे,मग दिवसभराचे सगळे सीन्स ते मागून घ्यायचे,मग त्या अख्या सीन्सचं मनन चिंतन पाठांतर करत शांतपणे बसायचे, बरं अण्णांनाच त्या सीन्स मध्ये जास्त बोलायचं असायचं, बरं एक दोन पानं नाही तर 17 ते 18 पानांचा एक सीन असायचा. पाठ करून त्यांना ज्या काही शंका, किंवा suggestions असतील त्या व्यवस्थित त्याचं निरसन करून घ्यायचे, एकदा का त्यांच्या डोक्यात तो सीन फिट बसला की मग ते गप्पा मारायला मोकळे व्हायचे,


News18लोकमत

माझी आणि अण्णांची एकच मेकअप रूम होती,त्यामुळे अण्णांच्या जुन्या जुन्या आठवणी ऐकायला फार मजा यायची, ते Encyclopedia होते, अगदी पन्नास वर्षांपूर्वीच्या गोष्टी सुद्धा त्यांना detail मध्ये आठवायच्या,बारा ते चौदा तासाचं शूटिंग, जिथे अगदी so call तरुण मंडळी संध्याकाळपर्यंत ढेपाळलेली असायची, इथे अण्णा पॅकअप होईपर्यंत अगदी fresh ,active ,energetic असायचे, हसत मुख ,Set वर एका professional कलाकाराने कसे असायला पाहिजे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखं होतं.

अण्णांनी इतक्या शिकण्यासारख्या गोष्टी मागे ठेवल्या आहेत की,ज्यांना ज्यांना तुमच्याबरोबर काम करायची संधी, सौभाग्य मिळालं आहे ते खरंच भाग्यवान आहेत, मी आत्ताच जवाहर बाग स्मशान भूमी ठाणे येथे अण्णांचं Electric Cremation करून घरी आलो, आत्ता आण्णा शरीराणे नाहीत पण चा प्रसन्न चेहरा मी माझ्या डोळ्यात साठवून ठेवला आहे, मिश्किल स्वभाव , आयुष्यं कसं छान जगाव.आण्णा माझ्या मनामध्ये कायम घर करून राहणार आहेत. अभिनेते जयंत सावरकर यांना सर्वजण प्रेमानं आण्णा म्हणत असे. त्यांनी एक मुलाखत दिली होती. यामध्ये त्यांनी त्यांच्या आरोग्याचं रहस्य सांगितलं होतं. तेव्हा ते म्हणाली होते की, मी नेहमी सकाळी चारला उठतो. मग रात्री कितीही उशीरा का झोपेना, त्यामुळेच मी नेहमी टवटवीत दिसतो. शिवाय या वयातही मला कसलचं दुखणं म्हणजे सांधेदुखी नाही. त्याला कारणही तसंच आहे. मी कुठलीही गोळी देखील खात नाही, मी आयुर्वेदिक उपाय करतो.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button