health lifestyle what is the Perfect Weight according to Height Expert Guide to Healthy BMI…

eal Body Weight: निरोगी आयुष्यासाठी शरीर निरोगी आणि सुदृढ असणंही तितकंच महत्त्वाचं असतं. शरीराची उंची आणि वजन या समीकरणात समतोल राखता आला म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अर्था टप्पा तर इथंच ओलांडला असं म्हणतात. वजन गरजेपेक्षा वाढलं तरीही आणि ते अनपेक्षितरित्या कमी झालं तरीही शरीरावर, मनावरही त्याचे परिणाम दिसून येतात. यासाठी वजनसोबतचं शरीराच्या उंचीचं नातं समजून घेणंही महत्त्वाचं. या परिमाणात समतोल राखण्याला शास्त्रीय भाषेत ‘बॉडी मास इंडेक्स’ (BMI) असं म्हणतात.
बीएमआय कसं मोजावं?
बीएमआय म्हणजे बॉडी मास इंडेक्स. यामाध्यमातून तुमच्या उंचीच्या हिशोबानं तुमचं वय किती आहे याचा अंदाज लावला येतो. बीएमआय मोजण्यासाठीचं एक सूत्र आहे.
BMI= वजन (किलोग्राम) / उंची (मीटर)²
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीचं वजन 70 किलो आणि त्यांची उंची 6 फूट आहे, तर त्यांचा बीएमआय असेल …
70 / (1.83 × 1.83) = 20.90
तुमचा बीएमआय BMI 18.5 ते 24.9 दरम्यान असल्यास तो आरोग्यदायी समजला जातो. 18.5 हून कमी बीएमआय म्हणजे तुमचं वजन कमी आहे आणि 25 हून अधिक बीएमाय असल्यास तुमचं वजन जास्त आहे हे ठरतं.
उंचीनुसार किती असावं वजन?
152 सेमी (5 फूट): महिला 40–50 किलो, पुरुष 43–53 किलो
160 सेमी (5.3 फूट): महिला 47–57 किलो, पुरुष 50–61 किलो
165 सेमी (5.5 फूट): महिला 51–62 किलो, पुरुष 55–68 किलो
170 सेमी (5.7 फूट): महिला 55–67 किलो, पुरुष 60–73 किलो
175 सेमी (5.9 फूट): महिला 59–72 किलो, पुरुष 65–79 किलो
180 सेमी (6 फूट): महिलाएं 63–77 किलो, पुरुष 70–85 किलो
जाणकारांच्या मते BMI हा महत्त्वाचा विषय असला तरीही त्यामध्ये पोटाची चर्बी (belly fat) मोजली जात नाही. जिथं वाढत्या वजनामध्ये या चर्बीमुळंच अर्ध्याहून अधिक व्याधी बळावतात. ICMR च्या माहितीनुसार फक्त बीएमआय नव्हे, तर पोटाची चर्बी आणि कमरेचा घेर मोजणंही तितकंच महत्त्वाचं आहे. जर पुरुषांची कंबर 90 सेंटीमीटरहून जास्त आणि महिलांची कंबर 80 सेंटीमीटरहून अधिक असेल तर भविष्यात या मंडळींना स्थूलता, हृदयाचे विकार यांचा धोका अधिक असतो.
(वरील माहिती सामान्य संदर्भांवर आधारित असून झी 24 तास त्याची खातरजमा करत नाही.)