स्वास्थ्य

Viral weight loss News Chinese gym offers Porsche for losing 50 kg in 3 months


Viral News: जीमला जाण्याचा कंटाळा हा जागतिक प्रश्न आहे असं मस्करीत म्हटलं जातं. अनेकजण नवीन वर्षाचा संकल्प म्हणून जीमची मेंबरशीप घेतात. मात्र पहिल्या आठवड्याच्या आतच त्यांचा उत्साह मावळतो आणि जीमची वाटही आठवत नाही असा प्रकार सामान्य बाब आहे. मात्र एका जीमने आपल्या मेंबर्सला प्रोत्साह देण्यासाठी चक्क सुपर कार भेट म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या जगभरामध्ये जीमच्या या निर्णयाची चर्चा आहे.

Add Zee News as a Preferred Source

नेमकं हे चॅलेंज काय?

चीनमधील शांडोंग प्रांतात असलेल्या बिन्झोऊ येथील एका जीमने एक अनोखं चॅलेंज आपल्या मेंबर्ससाठी सुरु केलं आहे. या फिटनेस सेंटरने तीन महिन्यामध्ये म्हणजेच 90 दिवसांमध्ये 50 किलो वजन कमी करु शकणाऱ्या व्यक्तीला पोर्शे पॅनामेरा कार भेट देण्याची ऑफर दिली आहे. 23 ऑक्टोबर रोजी ही घोषणा करण्यात आली आहे. मात्र आता सोशल मीडियावर ही ऑफर व्हायरल झाल्यानंतर चर्चेला उधाण आलं आहे. एकीकडे या बक्षिसाची चर्चा असतानाच दुसरीकडे आरोग्यविषय तज्ञांनी एवढ्या कमी वेळात एवढं वजन कमी करणं धोक्याचं ठरु शकतं असा इशारा दिला आहे.

या कारची किंमत किती?

या जीमच्या प्रमोशनल पोस्टरनुसार, या चॅलेंजमधील विजेत्याला चिनी चलनानुसार 1.1 दशलक्ष युआन ( भारतीय चलनानुसार अंदाजे 1 कोटी 36 लाख रुपये) किमतीची पोर्श पॅनामेरा बक्षीस म्हणून दिली जाणार आहे. 

त्यानंतर रजिस्ट्रेशन होणार बंद

वांग नावाच्या एका फिटनेस प्रशिक्षकाने स्थानिक प्रसारमाध्यम असलेल्या ‘शियांग यांग व्हिडिओ’शी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. “हे चॅलेंज खरं आहे आणि आधीपासूनच सुरू झालं आहे,” असं वांग म्हणाले.  त्यांनी असेही सांगितले की 30 जणांनी यासाठी नोंदणी केल्यानंतर नोंदणी बंद केली जाणार आहे. आतापर्यंत हे आव्हान सात ते आठ जणांनी स्वीकारलं आहे.

रजिस्ट्रेशन फी किती?

या चॅलेंजसाठी नोंदणी शुल्क 10 हजार युआन (सुमारे 1.24 लाख रुपये) इतके आहे. ही नोंदणी करणाऱ्यांच्या राहण्याच्या सोयीपासून ते जेवणापर्यंत सर्व गोष्टींची काळजी जीमकडून घेतली जाणार आहे. मात्र कोणत्या पद्धतीचा व्यायम किंवा वर्कआउट्स अथवा डाएट या स्पर्धांना दिला जाणार आहे याची माहिती जीमने उघड केलेली नाही. वांग यांनी स्पष्ट केले की ऑफर करण्यात आलेली ही पोर्श कार नवीन नसून जीम मालकाच्या मालकीची आहे. या कारचं मॉडेल 2020 सालातील आहे.

नव्या वादाला फुटलं तोंड

या चॅलेंजची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेकांनी या चॅलेंजमध्ये सहभागी होणाऱ्यांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर काय? असा प्रश्न उफस्थति केला आहे. “मी स्वत: 50 किलो वजन कमी केलं तर अवघा पाच किलोचा राहील. हे चॅलेंज स्वीकारल्यावर मी जिवंत राहील का हाच मला प्रश्न आहे,” असं एकाने म्हटलं आहे. 

डॉक्टर म्हणतात हे धोकादायक…

वैद्यकीय तज्ञांनीही या चॅलेंजच्या सुरक्षिततेबद्दल चिंता व्यक्त केली आहे. ‘वेइबो’वरील (लोकप्रिय चिनी सोशल मिडिया साईट) लोकप्रिय मेडिकल इन्फ्युएन्सर डॉ. झेंग यांनी इशारा दिला की दररोज अर्था किलो वजन कमी करणे हे फारच धोकादायक आहे. अशा स्थितीमध्ये चरबी कमी होण्याऐवजी स्नायू कमी होण्याचा धोका अधिक असल्याचंही झेंग यांनी सांगितलं. 



Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button