महाराष्ट्र

Hingoli First Successful Knee Replacement Surgery; 61-Year-Old Patient Treated at Laxmi Life Care Hospital | हिंगोलीमध्ये पहिल्यांदाच गुडघा प्रत्यारोपण: 61 वर्षीय वृद्धावर शस्त्रक्रिया, दुसऱ्या शहरांत जाण्याचा भुर्दंड वाचणार – Hingoli News



शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये पहिल्यांदाच यशस्वीपणे पूर्ण गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रीया करण्यात आली. ही शस्त्रक्रीया ६१ वर्षीय वयोवृध्द पुरूषावर पार पडली. ही वैद्यकीय कामगिरी रुग्णालयासाठी एक ऐतिहासिक टप्पा ठरला आहे.

.

औंढा नागनाथ तालुक्यातील भोसी येथील अशोकलाल रामचंद्र जैस्वाल या वयोवृध्द व्यक्तीला गुडघ्याचा त्रास अधिक होता. त्यामुळे त्यांना हिंगोली शहरातील लक्ष्मी लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या दिर्घकाळ चालणार्‍या गुडघेदुखीवर कोणतेही औषध व उपचार परिणामकारक ठरत नसल्याने या व्यक्तीच्या गुडघ्यावर शस्त्रक्रीया करणे गरजेचे होते. हृदयरोग तज्ञ डॉ. अखिल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अस्थिरोगतज्ञ डॉ. महेश मोरे पाटील, भुलतज्ञ डॉ. प्राची अखिल अग्रवाल, डॉ. सुनिल तरोडे, सहाय्यक सय्यद अमीर, प्रशांत धाबे, गौरव जाधव या वैद्यकीय पथकाने पुढाकार घेतला. त्यामुळे प्रत्यारोपण हिच योग्य उपाययोजना ठरली असल्याची माहिती डॉ. मयुर अग्रवाल यांनी दिली.

ही शस्त्रक्रीया आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पार पडली असुन रुग्ण आता पुर्णपणे बरा होऊन काही आठवड्यात तो नेहमी प्रमाणे चालू फिरू शकेल. रुग्णालय प्रशासनाच्या मते भविष्यात आणखी शस्त्रक्रीया नियमितपणे करण्याचा त्यांचा मानस आहे. जेणे करून परिसरातील रुग्णांना शहरातच चांगला उपचार मिळू शकेल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button