महाराष्ट्र

Mumbai Rohit Pawar Slams BJP and Sambhaji Bhide; Calls Constitution Removal True Manuwadi…

संविधान हटवणे हाच भाजप व मनुवादी विचारांचा खरा अजेडा असल्याची जहाल टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी भाजप व शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर निशाणा साधताना केली. संतानी दिलेला समत

.

संभाजी भिडे यांनी आपल्या नाशिक दौऱ्यात लाल किल्यावर भगवा झेंडा फडकवण्याचा संकल्प व्यक्त केला होता. आपण स्वातंत्र्यावेळी तिरंगा झेडा स्वीकारला. आपण तिरंगा व संविधान मानलेच पाहिजे. पण भगवा ध्वज हा हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. त्यामुळे देव, देश व धर्मासाठी आपण कटिबद्ध असले पाहिजे. आम्ही 15 ऑगस्ट रोजी तिरंगा फडकावूच, पण दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फकडवण्यासाठीही सतत काम करत राहू, असे ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानातून त्यांचा मूळ हेतू हा तिरंग्याचा जागी भगव्याची प्रतिष्ठापणा करण्याचा असल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी उपरोक्त टीका केली आहे.

मनुवादी विचाराला नेहमीच आमचा विरोध

रोहित पवार मंगळवारी सकाळी एका ट्विटद्वारे म्हणाले की, संविधान हटवणं हाच भाजपचा आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा राहिला असून वादग्रस्त तथाकथित गुरुजींची पात्रे त्यासाठीच उभी केली गेली आहेत. तिरंगा झेंडा, संविधानाची मुलभूत तत्वे यावर या वादग्रस्त लोकांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करवून घेतली जातात आणि जनमताची प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करून घेतलं जातं.

संतानी दिलेला समता, मानवता व सामाजिक न्यायाचा, शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार संपवण्यासाठी, संविधान संपवण्यासाठी छुपा अजेंडा चालवणाऱ्या या वादग्रस्त गुरुजीसारख्यांच्या हजार पिढ्या जन्माला आल्या तरी संविधान कुणी संपवू शकणार नाही, हे वादग्रस्त गुरुजींच्या मनुवादी मालकांनी लक्षात घ्यावं. सर्वसामान्यांच्या हक्कांना, महिलांच्या हक्कांना डावलणं हाच आधार असलेल्या मनुवादी विचाराला नेहमीच आमचा विरोध आहे, असे ते म्हणाले.

मेघना बोर्डीकर यांचाही घेतला समाचार

रोहित पवार यांनी अन्य एका पोस्टद्वारे अधिकाऱ्याला कानशिलात हाणण्याची भाषा करणाऱ्या राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले, आदरणीय मेघनाताई, आपल्या कार्यक्रमाचा व्हिडीओ बघितला तर आपण मंत्री असूनही अधिकाऱ्यांकडून आपला इगो दुखावला असल्याचे स्पष्ट दिसून येते. अधिकाऱ्याला कानात मारण्याची भाषा करण्याअगोदर आपण काय बोललात तो व्हिडिओ देखील मी इथं शेअर करतोय, त्यात कार्यक्रमाला अपेक्षित गर्दी नसल्याने आणि राजकीय श्रेय मिळत नसल्याने आपला दुखावलेला इगो स्पष्ट दिसतो.

ताई, आपल्याबद्दल आदरच आहे परंतु संवैधानिक पदावर असताना असंवैधानिक कृती करणार असाल तर मात्र ते समर्थनीय नाही. भर सभेत आपल्या कुटुंबियाकडून बंदोबस्तावरील पोलिसांना अत्यंत अश्लाघ्य शिवीगाळ केल्यावर टाळ्या वाजवून दाद देणाऱ्या राज्यकर्त्यांकडून काय अपेक्षा करणार? असे रोहित पवार म्हणाले.

हे ही वाचा…

संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त विधान:म्हणाले – सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरूष; लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्याचा संकल्प

नाशिक – शिवप्रतिष्ठाण हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी सर्वधर्म समभावाच्या मुद्यावर आणखी एक वादग्रस्त विधान केले आहे. सर्वधर्म समभाव म्हणजे ना धड स्त्री ना धड पुरुष. हा निव्वळ नपुंसकपणा आहे, असे ते म्हणालेत. यावेळी त्यांनी दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भगवा फडकवण्यासाठी सतत काम करण्याचाही संकल्प व्यक्त केला. वाचा सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button