महाराष्ट्र

Mumbai: Uddhav Thackeray Slams BJP Over Missing Vice President Jagdeep Dhankhar; Launches…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड गायब झाल्यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. जगदीप धनखड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव आपल्या उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. पण आजतागायत त्यांच

.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात आज मुंबईत महायुती सरकारविरोधात जनआक्रोश आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना ते म्हणाले, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झाला आहे. महाराष्ट्राच्या जिल्ह्यात व प्रत्येक शहरात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करण्यासाठी मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या शिवसेनेत आहेत. या भ्रष्टाचाऱ्यांचे करायचे काय… (खाली मुंडे वर पाय) असे तुम्ही म्हणालात. पण डोके असेल तर ना… कारण, हे बिनडोक्याचे लोक आहेत. त्यांना केवळ पायच आहेत. सुरतेला व गुवाहाटीला पळून जायला. यांच्याकडे डोके नाहीत केवळ खोके आहेत. त्यामुळे ते खोके घेऊन बसलेत.

दिल्लीत इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला

उद्धव ठाकरे म्हणाले, आज दिल्लीत महाविकास आघाडी, इंडिया आघाडीतर्फे सर्व खासदारांचा मोर्चा हा निवडणूक आयोगाकडे चालला आहे. पण पोलिसांनी त्यांचा मार्ग रोखला आहे. आपण भ्रष्टाचाराविरोधात रस्त्यावर उतरलो आहोत. ही जी काही जुलूमशाही सुरू आहे, त्याच्याविरोधात जनतेला रस्त्यावर उतरावेच लागेल. ती उतरलेलीच आहे. ती वाट पाहत आहे की नेतृत्व कोण करतंय? लाज एका गोष्टीची वाटते, आपण दरवेळी सांगतो की, हा शाहू- फुले – आंबेडकरांचा व साधूसंतांचा महाराष्ट्र आहे. हे राज्य नेहमी देशाला दिशा दाखवते. पण या भ्रष्ट आघाडीने तो कितव्या रांगेत नेऊन बसवला आहे? भ्रष्टाचारात नंबर एक, पहिल्या रांगेत. भ्रष्टाचाराची रांग लावली तर महाराष्ट्र पहिल्या रांगेत येईल, पण विकास व नितीमत्ता पाहिली तर महाराष्ट्र शेवटच्या रांगेत दिसेल. आम्हाला खरोखर लाज वाटत आहे या लोकांची.

मी त्या वनमंत्र्याला वनवासात पाठवले होते

ठाकरे पुढे म्हणाले, महाराष्ट्राची आजपर्यंतची एक परंपरा आहे. कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाला की, त्याची जबाबदारी घेऊन किंवा संबंधित मंत्र्यावर जबाबदारी टाकून त्याचा राजीनामा घेतला जात होता. त्यानंतर त्याला चौकशीला सामोरे जावे लागते. मी स्वतः मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले. माझ्या एका मंत्र्यावर महिलेसंबंधीचे अतिशय वाईट आरोप झाले होते. तो मंत्री वनमंत्री होता. पण मी त्याला वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रातही अशा काही घटना घडल्या आहेत.

मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना 5 मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यात शोभाताई फडणवीस, शिवणकर, घोलप, सुतार, रवींद्र माने यांचा समावेश होता. आपलेच होते काही. पण त्यानंतरही शिवसेनाप्रमुख त्यांचे राजीनाने घेण्यासाठी मागे हटले नव्हते. जनतेच्या मनात संशय आहे. तुम्ही निर्दोष आहात तर राजीनामा देऊन चौकशीला सामोरे जा. त्यात निर्दोष सिद्ध झाला तर मी पुन्हा मंत्रिमंडळात संधी देईन, असे ते म्हणाले होते. याला म्हणतात कारभार. याला म्हणतात जनताभिमुख सरकार. पण आत्ताच्या सरकारला केवळ पैसे गिळणारे मुख आहे, असे ते म्हणाले.

कोकाटे हे क्रीडा मंत्री नव्हे तर रमीमंत्री

आपण या सरकारची अब्रु पुराव्यांनिशी वेशीवर टांगली. कुणी डान्सबार चालवतो? कुणी पैशांच्या बॅगा घेऊन बसलाय? हा आमचा मंत्री? पण एक गोष्ट विचित्र किंवा चांगली पाहायला मिळाली की, जसे अभ्यास कोणताही असो तुमची आवड कोणतीही असो, पण तुम्हाला सत्ता टिकवण्यासाठी कोणतेतरी मंत्रिपद द्यावे लागते. पण पहिल्यांदा असे झाले की, एका व्यक्तीला त्याच्या आवडीचे खाते मिळाले. माणिकराव कोकाटे हे रमीमंत्री आहेत. ते क्रीडामंत्री नाहीत. शेतकऱ्यांची चेष्टा करतात, थट्टा करतात. भर सभागृहात रमी खेळतात. तुम्ही कशात रमतात तुम्ही?

तुमच्याकडे शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी पैसे नाहीत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. देवेंद्र फडणवीस हे भाजपची परंपरा चालवणारे असतील असे मला वाटले होते. पुराव्यांनिशी आरोप केल्यानंतर मंत्र्यांची विनाचौकशी हकालपट्टी केली जाईल अशी आम्हाला अपेक्षा होती. पण मुख्यमंत्र्यांनी त्यांना केवळ समज दिली की, यावेळी रमी नको खेळून तीनपत्ती खेळ. अशी कशी समज? पुढच्यावेळी बॅग उघडी ठेवू नव्हे तर बंद ठेव, अशी समज देऊन या मंत्र्यांना सोडून देण्यात आले. पुढच्या वेळी तू सावली बार काढू नको, भर उन्हाचा बार काढ, असे उद्धव ठाकरे रामदास कदम व त्यांचे सुपुत्र तथा राज्याचे गृह राज्यमंत्री योगेश कदम यांना टोला हाणताना म्हणाले.

जगदीप धनखड कुठे आहेत?

उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, तुम्ही भ्रष्टाचाऱ्यांना पुरावे देऊनही केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग आमच्या उपराष्ट्रपतींना तत्काळ राजीनामा घेऊन त्यांना वनवासात का पाठवले? जगदीप धनखड कुठे आहेत? त्यांचा राजीनामा का घेतला? कारणच समोर आले नाही. मी दिल्लीत गेलो तेव्हा माझ्या कानावर आले होते की, ते या सरकारविरोधात काहीतरी कारस्थान करत होते. हा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढले आणि गायब केले. मग त्यांना का समज देऊन सोडून देण्यात आले नाही? पुन्हा असे करायचे नाही, नाहीतर मी तुम्हाला पट्टीने मारीन असे सांगून त्यांनाही या मंत्र्यांसारखे सोडता आले असते.

आज जगदीप धनखड गायब झालेत. चीनमध्ये सरकारविरोधात बोलणारा नेता दोन-तीन दिवसांत गायब होतो असे सांगितले जाते. तो कुठे जातो तेच कळत नाही. आज आमचे उपराष्ट्रपती गायब झालेत. ते कुठे आहेत? ते तरी दाखवा. त्यांनी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. पण त्यांच्यावर कोणत्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत? कोणता डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत आहे? की तुम्ही डायरेक्ट त्यांचे ऑपरेशन केले आहे? नेमके धनखडांचे झाले काय? त्यामुळे ज्या दिशेने हा राज्यकारभार चालला आहे, ज्या दिशेने आपला देश व महाराष्ट्र चालला आहे, ते पाहता पुन्हा आपल्या खांद्यावर जबाबदारी आली आहे, असे ते म्हणाले.

राज्यात भ्रष्टाचार पे चर्चा सुरू करा

हे शिवसेना स्टाईलचे आंदोलन नाही. शिवसेना स्टाईलचे आंदोलन कसे असते हे सर्वांना माहिती आहे. पण आज मी तुम्हाला सर्वांना सांगत आहे की, 2014 साली मोदींनी जशी चाय पे चर्चा केली होती, तशी चर्चा तुम्ही चहा पिताना, केस कापताना सलूनमध्ये, सावली बार सोडून कुठेही बसलात तरी भ्रष्टाचार पे चर्चा करा. महाराष्ट्रात भ्रष्टाचार पे चर्चा होऊ द्या. जोपर्यंत हे भ्रष्टाचारी मंत्री काढले जात नाहीत, तोपर्यंत आपले आंदोलन थांबणार नाही. मला देवेंद्र फडणवीस यांची किव येते. तुमच्याकडे पाशवी बहुमत आहे, वरती तुमचे बापजादे बसलेत. तरी सुद्धा भ्रष्टाचाऱ्यांची हकालपट्टी करण्याची तुमची हिंमत होत नाही?

देवेंद्र फडणवीस या भ्रष्ट लोकांना पाठिशी घालत आहे. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे. पण त्यांना अध्यक्ष होण्यासाठी माणूस मिळत नाही. तसेच तुम्हाला हे भ्रष्ट काढून त्यांच्याजागी दुसरा माणूस घेण्यासाठी कुणी सापडत नाही का? कुणाचा दबाव आहे तुमच्यावर? फडणवीसांनी आपल्याला हा भ्रष्टाचार पटत असल्याचे जाहीर करावे किंवा भ्रष्ट मंत्र्यांची हकालपट्टी करावी, असे ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button