अपराध

कार चोरीची पद्धत ऐकून व्हाल हैराण, चावी नव्हे QR कोडने कार करत होता गायब


आगरा, 28 जुलै : देशात दिवसेंदिवस चोरीच्याही घटना सातत्याने समोर येत आहेत. यातच आता आग्रामध्ये एका गँगचा मोठा खुलासा झाला आहे. ही गँग आलिशान गाड्यांना विनाचाबी चोरुन अन्य राज्यात त्या गाड्यांची विक्री करत होते. हे हायटेक वाहन चोरटे विनाचाबी फक्त वाहनाचा क्यूआर कोड स्कॅन करायचे आणि मग त्याची सुरक्षाप्रणाली हॅक करुन अगदी काही सेकंदमध्ये त्या कारचे लॉक तोडायचे आणि मग कार घेऊन पोबारा करायचे. याप्रकरणी सुधन सिंह या चोरट्याला अटक केल्यावर या सर्व घटनेचा खुलासा झाला आहे. सध्या वाहनचोरांविरोधात आग्रा पोलीस सक्तीने कारवाई करत आहे. आतापर्यंत 15 ते 16 चोरट्यांना पोलिसांनी तुरुंगात टाकले आहे. पोलीस चौकशीत या चोरट्यांनी सांगितले की, ते ऑनलाईन पद्धतीने एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस मागवत होते. हे डिव्हाइस चीनमध्ये तयार होते आणि भारत बॅन होते. या डिव्हाइसच्या माध्यमातून हे लोक वाहनांना क्युआर कोड स्कॅन करायचे आणि विनाचाबी वाहनांचे लॉक तोडायचे आणि अगदी काही सेकंदात या आलिशान वाहनांना घेऊन फरार व्हायचे.


News18लोकमत

सुधान सिंह याच्यावर 50 हजारांचे बक्षीस होते. त्याने पोलीस चौकशीत सांगितले की, मेरठचा चोरबाजार बंद झाल्यावर हे लोक चोरी केलेल्या वाहनांना बिहार पश्चिम बंगाल, महाराष्ट्रात कमी पैशांमध्ये विकायचे. कारण, अशा वाहनांची मागणी याच राज्यांमध्ये व्हायची आणि मग या मागणीनुसार ते वाहन चोरी करायचे. सध्या आग्रा पोलीस या वाहनचोरांविरोधात अभियान राबवत आहे. या माध्यमातून अनेक चोरट्यांना तुरुगांत टाकण्यात येत आहे. शहराचे पोलीस उपायुक्त सूरज राय म्हणाले की, यासारख्या आणखी इतर चोरट्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध ठिकाणी टीम बनवली आहे. पोलीस आणि सर्व्हिलांस आणि एसओजी टीम या चोरट्यांवर लक्ष ठेवून आहे, अशी माहितीही त्यांनी दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button