नावाला भूलतज्ञ डॉक्टर पण तरुणांना ओढायचा ISIS च्या जाळ्यात, करायचा ब्रेनवॉश – News18 लोकमत

वैभव सोनवणे, प्रतिनिधी पुणे, 28 जुलै : काही दिवसांपूर्वी दुचाकी चोरीच्या घटनेत पुणे पोलिसांनी तिघांना पकडलं होतं. त्यानंतर जे समोर आलं त्यानं पुणेच नाही तर संपूर्ण देशात खळबळ माजली. या दोघांचाही दहशतवादी कारवाईत हात असल्याचा संशय आहे. या प्रकरणात एकएक गोष्ट उलगडू लागली आहे. महाराष्ट्र एटीएसनंतर आता एनआयएनेही मोठी कारवाई केली आहे. इसिसमध्ये तरुणांना भरती करण्याची जबाबदारी असलेला डॅाक्टरला एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पुण्याच्या कोंढवा परिसरातून अटक केली आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) ISIS महाराष्ट्र मॉड्यूल प्रकरणात ही कारवाई केली आहे. डॉ. अदनान अली असं या डॉक्टरचं नाव आहे. हे पुण्यातील कोंढवा परिसरात राहत होते. कोंढवा परिसरात ते भूलतज्ञ होते. तरुणांना ISIS ची माहिती देऊन त्यांना ISISच्या जाळ्यात अडकवण्याचं काम करत होता. वैद्यकीय व्यवसाय करताना दहशतवादाला मदत? इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलमध्ये राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा अर्थात एनआयएने पुण्यातल्या कोंढव्यातून डॉ. अदनान अली सरकारला इसिसच्या दहशतवादी विचाराचा प्रसार केल्याचा आरोपांखाली अटक केल्याने पुण्याच्या वैद्यकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्युलचा उलगडा करत महिन्याभरापूर्वी एनआयएने मुंबईत गुन्हा दाखल करून तीन आरोपीना अटक केली होती. त्यापैकी जूबेर शेख नावाचा संशयित आरोपीही एनआयएने अटक केला होता. या आरोपीकडे केलेल्या चौकशीत पुण्यातील प्रसिध्द भूलतज्ज्ञ डॅा. अदनान अली सरकार यांच नाव समोर आलं होतं. त्यानंतर एनआयएने डॉ. अदनान अली सरकारची तीन दिवस कसून चौकशी केली आणि अखेर त्याला अटक केली. वाचा –
पुण्यातील दहशतवादाचं अलसफा रतलाम मॅाडेल काय आहे? महाराष्ट्र ATS ने केला पर्दाफाश डॉ. अदनान अली सरकार हा पुण्यातल्या अनेक नामांकित रूग्णालयात भूलतज्ज्ञ म्हणून काम करत होता. इतकच नाही तर डॉ. अली हा बी जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून उत्तम क्रमांकाने उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे सरकारच्या अटकेनंतर अनेकांना धक्का बसला आहे. अली सरकार हा इसिसच्या महाराष्ट्र मॅाड्यूलसाठी तरुणांचं ब्रेन वॅाशिंग करून त्यांना इसिससाठी काम कराव म्हणून प्रेरित करता होता. नेमका कोण आहे अदनान अली? एनआयएने अटक केलेले अदनान अली सरकार हा मूळचा बोहरी मुस्लिम होता. त्याच्या वडिलांचे बोहरी आळीत नट बोल्टचे दुकान होते. मात्र, अदनान अली सरकार याने डॉक्टर झाल्यानंतर सुन्नी पंथ स्वीकारला. त्यानंतर धार्मिक व्याख्याने देऊ लागला. काही धार्मिक पुस्तके त्याने लिहिली आहेत. एनआयएने याच प्रकरणात कोंढव्यातून अटक केलेला जुबेर नुर मोहम्मद शेख हा सरकार याच्या लहान भावाचा मेहूणा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :