डान्स रिअॅलिटी शोमुळे मुलांचं बालपण संपल्यात जमा; अभिनेत्री शर्वरी जेमिनिस मांडलं स्पष्ट मत –…

मुंबई, 29 जुलै : 1999 साली प्रदर्शित झालेल्या बिनधास्त या सिनेमातून मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणारी अभिनेत्री शर्वरी जेमनिस सर्वांना आठवत असेल. एक उत्तम अभिनेत्री आणि उत्कृष्ट कथ्थक नृत्यांगणा अशी आपली ओळख निर्माण केली. अभिनेत्री शर्वरी जेमिनिसनं फार कमी सिनेमात काम केलं. मात्र ज्या सिनेमात काम केलं तिचे ते सिनेमे हिट ठरले. पहिल्याच सिनेमासाठी तिला फिल्मफेअर पुरस्कारांनी गौरवण्यात आलं. अभिनयापेक्षा शर्वरी जेमिनीस नृत्यात जास्त रमली. प्रसिद्ध गुरू रोहिणी भाटे यांच्याकडे तिनं कथ्थक नृत्याचं शिक्षण घेतलं. त्यामुळे कायमच अभिनयाआधी नृत्य हे शर्वरीचं पहिलं प्रेम आहे. शर्वरीनं नुकत्याच एका मुलाखतीत सध्याच्या डान्स रिअलिटी शोवर भाष्य केलं आहे. एका डान्स रिअलिटी शोमध्ये भाग घेतल्यानंतर मुलांना खूप ग्लॅमर मिळतं. बॉलिवूडमध्ये अनेक संधी मिळत असतात. असं असताना तुझ्या शिष्यांना कथ्थक नृत्यात धरून ठेवण अवघड जातं का असा प्रश्न शर्वरीला सायली पानसे यांच्या मुलाखतीत विचारण्यात आला. यावेळी उत्तर देताना शर्वरीनं सध्याच्या लहान मुलांच्या डान्स रिअलिटी शोवर भाष्य केलं. हेही वाचा –
टेलिव्हिजन गाजवणाऱ्या दोन अभिनेत्री एकाच वाहिनीवर; TRPमध्ये कोण देणार कोणाला टक्कर?
शर्वरी म्हणाली, “लहान मुलांचे डान्सचे शो असतात. त्यामध्ये त्यांना कधी बालगीतांवर नृत्य करा, नर्सरी रॅम्सवर नृत्य करा असं कधीच सांगितलं जात नाही. असा विषयचं येत नाही. त्याचं मला खूप वाईट वाटतं. अप्सरा आली या गाण्यावर जेव्हा एक छोटी 5 वर्षांची मुलगी नाचते, तेव्हा ती कंबर हलवते, मान हवलते, डोळा मारते हे सगळं पाहताना लोकांना फार क्यूट वाटतं. कारण मुलीचं वयच तसं असतं. त्या वयात तिनं काही केलं तरी ते क्यूटच दिसणार”.
News18लोकमत
शर्वरी पुढे म्हणाली, “पण लोकांच्या आणि त्या कोरिओग्राफर्सच्या हे लक्षात येत नाही की, जेव्हा ते त्या मुलीला शिकवतात ‘यौवन बिजली पाहून थिजली’ तेव्हा ते आधीच तिला यौवनाचे एक्सप्रेशन्स देतात आणि तेव्हा तिथेच तिचं बालपण संपतं. तिचा निरागस भाव तिथेच संपलेला असतो. त्यामुळे मोठी झाल्यावर यौवन दाखवायची वेळच शिल्लक राहत नाही. ते तिलाजसं सांगतील तसं ती करते. मग त्यात ती कधी ओठही चावते. पण त्या गोष्टीचा अर्थच तिला कळलेला नसतो. त्यामुळे ती या सगळ्या गोष्टींमुळे आताच मोठी व्हायला लागते”.
शर्वरीच्या वर्कफ्रंट विषयी सांगायचं झालं तर शर्वरी पूर्णत: कथ्थक नृत्यासाठी काम करतेय. पुण्यात तिचे कथ्थकचे क्लासेस आहेत. अनेक मुली तिच्याकडे कथ्थकचं शिक्षण घेत आहेत. शर्वरीनं निखिल पाठकबरोबर लग्न केलंय. दोघांना एक मुलगा आहे. निखिल हा देखील प्रसिद्ध तबला वादक असून त्याचं दोघेही शास्त्रीय संगीत आणि कथ्थक यांचे एकत्र व्हिडीओ शेअर करत असतात. शर्वरीचे डान्सचे व्हिडीओ देखील ती शेअर करत असते. प्रसिद्ध गाण्यांवर ती करत असलेले एक्सप्रेशन्स रिल चाहत्यांना खिळवून ठेवतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.