महाराष्ट्र

Shivsena Protest Shivaji Nagar Underpass Water Leak | संभाजीनगरच्या भुयारी मार्गात पाणी गळती:…


छत्रपती संभाजीनगर शहरातील शिवाजीनगर भुयारी मार्गासाठी शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज गुरुवार २१ ऑगस्ट रोजी जोरदार आठवा अजूबा आंदोलन करण्यात आले. महानगरप्रमुख राजू वैद्य यांच्या मार्गदर्शनाखाली तर शिवसेना संभाजीनगर पश्चिम शहर प्रमु

.

पालकमंत्र्याच्या दबावापोटी घाईघाईत केलेल्या या भुयारी मार्गाच्या उद्घाटनामुळे पाण्याची गळती लागली आहे. या गळतीमुळे भुयारी मार्ग खाली मोठ्या प्रमाणात पाणी साचत असून पावसाळ्यात नागरिकांना प्रवासासाठी मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने याचा निषेध म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्री हाय हाय…मनपा प्रशासन हाय हाय… उद्घाटन करून श्रेय घेणाऱ्या पालकमंत्र्याचा धिक्कार असो, अशा जोरदार घोषणाबाजी यावेळी शिवसैनिकांनी करून परिसर दणाणून सोडला.

आठवा अजुबा ठरावा असे बांधकाम

महानगरपालिकेचे आयुक्त, प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी, आयुक्त आणि अभियंता यांनी कौतुकास्पद केलेल्या कार्याचे अभिनंदन करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले असल्याचे उपरोधिक टीका, शिवसेना महानगर प्रमुख राजू वैद्य यांनी केली. भुयारी मार्गाची रचना सुव्यवस्थित पद्धतीने करण्यात आली नाही. गुत्तेदाराने प्रत्यक्ष केलेल्या कामाकडे लक्ष दिले गेले नाही. यामुळे सर्व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे हा शिवाजीनगर भुयारी मार्ग जगातला आठवा अजूबा ठरावा असे बांधकाम झाले आहे. त्यांचे कौतुक करावे म्हणून हे आंदोलन करण्यात आले. पालकमंत्र्यांनी श्रेय घेण्यासाठी घाईघाईने या भुयारी मार्गाचे उद्घाटन करायला लावले यामुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याची टीका वैद्य यांनी केली.

याप्रसंगी महानगरप्रमुख राजू वैद्य, शहरप्रमुख हरिभाऊ हिवाळे, दिग्विजय शेरखाने,उपहरप्रमुख प्रमोद ठेंगडे, वसंत शर्मा, दिनेश राजेभोसले, नितीन पवार, संजय पवार, विभागप्रमुख नंदू लबडे, सचिन वाघुळे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button