अभिनेत्रीचं 75 वर्षीय वृद्धासोबत धक्कादायक कृत्य; ‘या’ कारणासाठी ब्लॅकमेल करत उकळले 11 लाख

मुंबई, 28 जुलै : केरळच्या टेलिव्हिजन इंडस्ट्रीतून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका टेलिव्हिजन अभिनेत्रीने तिच्या मित्राच्या साहाय्याने एका ७५ वर्षांच्या भारतीय सैन्यातील माजी अधिकाऱ्याला फसवलं असल्याची माहिती समोर येत आहे. या अधिकाऱ्याला फसवून अभिनेत्रीने त्यांना 11 लाख रुपयांना गंडा घातल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला आहे. केरळच्या पठाणमथिट्टा मध्ये राहणाऱ्या या मल्याळम अभिनेत्रीचं नाव नित्या ससी असं असून तिला आणि आणि तिचा मित्र बिनू या दोघांना नुकतंच कोल्लम येथे पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना केरळमधील परवूर जिल्ह्यात घडली आहे. अभिनेत्री नित्या सासी हिचं वय 32 वर्ष असून ती मलयालपुझा, पठानमथिट्टा येथील रहिवासी आहे. या गंभीर गुन्ह्याप्रकरणी सध्या ती पोलिसांच्या ताब्यात आहे. नित्या स्वतः एक अभिनेत्री असण्यासोबत एक वकील देखील आहे.
News18लोकमत
रिपोर्टनुसार, नित्या आणि तिचा मित्र या दोघांनी मिळून केरळ विद्यापीठातील माजी कर्मचारी आणि 75 वर्षीय माजी सैनिक यांना आपला बळी बनवले आहे. या घटनेची सुरुवात 24 मे रोजी झाली. 24 मे रोजी घर भाड्यावर घेण्यासबंधी त्या वृद्ध सैन्यदलातील माजी अधिकाऱ्याशी नित्याने त्याच्याशी फोनवर संपर्क साधला होता. Sushmita Sen : ‘मी ठीक आहे पण…’ चाहत्यांनी चिंता व्यक्त करताच सुष्मिता सेनने दिली मोठी हेल्थ अपडेट काही दिवसांनी नित्या घर बघायला आली आणि तिची त्या व्यक्तीशी चांगलीच मैत्री झाली. त्यानंतर ती वारंवार त्याच्या घरी जाऊ लागली. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, ‘‘काही दिवसांनी त्यांनी त्या व्यक्तीला धमक्या देण्यास सुरुवात केली. एकदा तिने घरी येऊन त्या अधिकाऱ्याला कपडे काढण्यासाठी धमकावले, अन् नंतर तिचा मित्र बिनूने त्या दोघांचे मोबाइलमध्ये नग्न अवस्थेतील अश्लील फोटोज काढले.’’ त्यानंतर त्या दोघांनी त्या वृद्ध व्यक्तीकडे 25 लाख रुपयांची मागणी केली. याबरोबरच मोबाइलमधील नग्न फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकीदेखील दिली. सातत्याने धमक्या मिळाल्याने पीडित व्यक्तीने त्यांना 11 लाख रुपये देऊन टाकले. आता हे प्रकरण संपेल, असे त्याला वाटले, मात्र त्यानंतर या दोघांनी पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. अखेर याला कंटाळून त्या वृद्धाने या दोघांच्या विरोधात परावुर येथील पोलिस चौकीत तक्रार नोंदवली. नित्या आणि बिनू दोघांनाही पोलिसांनी अटक केली असून त्यांची चौकशी सुरू असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. लवकरच त्यांना कोर्टासमोर उभं केलं जाईल असंही सांगितलं जात आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
- First Published :