Atharva Sudame Controversial Reel Apologizes | सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामेवर टीकेचा…

प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर अथर्व सुदामे गणेशोत्सवासाठी बनवलेल्या एका रीलमुळे सध्या वादात सापडला आहे. या रीलमध्ये त्याने हिंदू-मुस्लिम ऐक्याचा संदेश दिला होता, यामुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोलिंगचा सामना करावा लागला. ट्रोलिंग आणि धमक्यांमुळे
.
अथर्वने मनोरंजन करण्यापुरते मर्यादित रहावे
ब्राह्मण महासंघाचे पदाधिकारी आनंद दवे यांनी अथर्व सुदामेवर टीका केली आहे. त्यांनी अथर्वला मनोरंजन करण्यापुरतेच मर्यादित राहण्याचा सल्ला दिला. दवे म्हणाले, “दूधात टाकलेली साखर ही साखरेचे काम करतेय की विषाचे काम करतेय, हे गेल्या ७००-८०० वर्षांपासून हिंदू भोगत आहेत. त्यामुळे हिंदू-मुस्लिम ऐक्य, गणपती कोणाकडून घ्यायचा, हे विषय तुझे नाहीत. हिंदूंना काय आणि कधी घ्यायचे हे कळते. तू फक्त तुझ्या मनोरंजनाचा धंदा कर.”
या टीकेनंतर अथर्व सुदामेवर आणखी दबाव वाढला आणि त्याने माफी मागितली. त्याने म्हटलं की, कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर तो माफी मागतो. यामुळे त्याने तात्काळ तो व्हिडिओ काढून टाकला.
अथर्वच्या रीलमध्ये काय?
गणेशोत्सवासाठी बनवलेल्या या रिलमध्ये अथर्व सुदामे एका भाविकाच्या भूमिकेत दिसतोय. अथर्व गणरायाची मूर्ती खरेदी करण्यासाठी मूर्तीकाराकडे जातो. मूर्तीकाराच्या कारखान्यात असंख्य मूर्ती असतात. त्यातली एक मूर्ती अथर्व निवडतो. तेवढ्यात मूर्तीकाराचा मुलगा अब्बू अशी हाक मारत तिथे येतो आणि अथर्व सुदामे आणि तो मूर्तीकार एकमेकांकडे पाहतात. तेवढ्यात मूर्तीकार अथर्वला सांगतो की, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही पुढे जाऊन मूर्ती पाहू शकता. मूर्तीकाराला वाटते की, अथर्व सुदामे मूर्ती खरेदी करेल की नाही? पण, अथर्व सुदामे तुमच्याकडूनच मूर्ती घ्यायची आहे, असे मूर्तीकाराला सांगतो.
अथर्व सुदामे मूर्तीकाराशी बोलताना म्हणतो की, “माझे वडील सांगतात की, आपण साखर व्हावे जी खीरही बनवते आणि शीरखुर्माही. तसेच आपण वीट व्हावे जी वीट देवाळातही लावली जाते आणि मशिदीमध्ये देखील.” असा अथर्वचा संवाद आहे. या रीलवरुन अथर्व सुदामेवर हिंदुत्वाद्यांकडून टीका होत आहे.