Auto news ganeshotsav 2025 hundai mg maruti car offers latest update price

Auto News : गणेशोत्सव (Ganeshotsav 2025). वातावरणात प्रचंड सकारात्मकला निर्माण करणाऱ्या या उत्सवाला आता सुरुवात झाली असून, सर्वत्र एकच हर्षोल्हास पाहायला मिळत आहे. अशा या सकारात्मक दिवसांमध्ये बरीच मंडळी नवी खरेदी, शुभकार्य करण्यासाठी पावलं उचलतानाही दिसत आहेत. यात कारखरेदी करु पाहणारेही मागे राहिले नाहीत.
गणरायाच्या आगमनासोबतच अनेकांनी आपल्या कुटुंबाला आश्चर्याचा धक्का देण्यासाठी म्हणून वाहन खरेदी करण्याचेही बेत आखले असतील. अशा सर्वच मंडळींसाठी ही एक ‘लॉटरी’ ठरणार आहे. कारण अनेक भारतीयांची पसंती मिळवलेल्या कारच्या काही खास ब्रँडनी या सणवारांच्या दिवसांमध्ये कारच्या दरांत कपात केली आहे. यामध्ये सुझुकी, एमजी, ह्युंडईचा समावेश आहे. जाणून आश्चर्य वाटेल पण, सवलतीचा हा आकडा 6 लाखांच्याही घरात आहे.
MG Motors ची बंपर ऑफर!
MG Motors या कंपनीनं त्यांच्या Comet EV, ZS EV, Astor, Hector आणि Gloster या मॉडेलवर ऑफर जारी केली असून, Comet EV वर ग्राहकांना 56,000 रुपयांची बचत करता येत आहे. तर, ZS EV आणि Astor वर 1.10 लाख, Hector वर 1.15 लाखांपर्यंतचा एक्स्ट्रा कॅशबॅक बोनस दिला जात आहे. लक्झकी SUV Gloster वर कंपनीनं दणदणीत अशी 6 लाखांची सवलत दिली आहे.
मारुतीसुद्धा शर्यतीत मागे नाही…
सवलतीच्या या शर्यतीत मारुतीसुद्धा मागे नसून या कंपनीकडून जिम्नी या लोकप्रिय मॉडेलवर 1 लाखांची सवलत दिली जात आहे. तर, स्विफ्ट AMT वेरिएंटवर 1.1 लाख रुपयांची तर, वॅगन आरवर 1.15 लाखांची सवलत मिळत आहे. कंपनीच्या एसयुव्ही ग्रँड विटारा कारवर तब्बल 2 लाखांची सवलत मिळत आहे.
ग्रेट होंडा फेस्ट…
होंडा कार्स इंडिया लिमिटेड सध्या ऑगस्ट महिन्यात ‘ग्रेट होंडा फेस्ट’ साजरा करत असून, यामध्ये कंपनीनं एकाहून एक सरस कारवर ग्राहकांना फायदा देणाऱ्या ऑफर जारी केल्या आहेत. ज्याअंतर्गत होंडा सिटीवर ग्राहकांना 1.07 लाखांची सवलत मिळत आहे. तर कारचं हायब्रिड वर्जन असणाऱ्या सिटी ई:HEV वर 96,000 रुपयांपर्यंत रक्कम कमी होतेय. सेकंड जनरेशन अमेजवर कंपनी 77,200 रुपये इतकी सवलत देत आहे.
ह्युंडईच्या ऑफरकडे दुर्लक्ष नको
सणावारांच्या या दिवसांमध्ये ग्राहकांना चांगल्या सवलती देण्यासाठी ह्युंडईनंही पुढाकार घेतला असून, कंपनीनं ग्रँड i10 निओस आणि अॅक्सेंट या कारवर 30,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस दिला आहे. याशिवाय 25 हजारांची वाढीव सवलतही मिळत आहे. तर, हुंडई टक्सन, अल्काजार, क्रेटा आणि वरनावरही कंपनी सवलत देत असून सर्वात मोठी सवलत तर कंपरनीच्या आयकॉनिक 2024 मॉडेलवर मिळत असून हा सवलतीचा आकडा आहे 4 लाख रुपये. त्यामुळं कुटुंबाला साजेशी कार खरेदी करायच्या विचारात असाल तर अधिकृत डिलरकडून घरी आणा तुमच्या आवडीची कार…