अपराध

पती कर्ज फेडू शकला नाही, सावकाराचा पत्नीवर बलात्कार, व्हिडीओ शूट करुन केला व्हायरल – News18…


पुणे, 27 जुलै : सावकारी फासातून सामान्यांची सुटका व्हावी यासाठी कायदा करण्यात आला. मात्र, त्यानंतरही सावकारी अत्याचार सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. पुण्यात घडलेल्या घटनेनंतर याची दाहकता समजू शकते. कर्जाची परतफेड न केल्याने एका सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर बलात्कार केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. पोलिसांनी गुरुवारी ही माहिती दिली. हडपसर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्याने सांगितले की, ही घटना यावर्षी फेब्रुवारी महिन्यात घडली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेच्या पतीने सावकाराकडून पैसे घेतले होते, मात्र तो ते फेडू शकला नाही. काय आहे प्रकरण? पुण्यातील इम्तियाज हसीन शेख (वय 47) हा खासगी सावकारीचा व्यवसाय करतो. त्याच्याकडून पीडितेच्या पतीने 40,000 रुपये व्याजाने घेतले होते. त्याने हे पैसे परत न दिल्यामुळे शेख त्यांना शिवीगाळ करु लागला. त्यानंतर फेब्रवारी महिन्यात हडपसर सरकारी कॉलनीमधील एका निर्मनुष्य जागी त्यांनी बोलवले. त्यानंतर चाकू काढून धकमवले. त्यानंतर त्या व्यक्तीच्या पत्नीवर बलात्कार केला. पीटीआयच्या वृत्तानुसार, पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने पीडितेच्या पतीला धमकावले आणि नंतर पतीच्या उपस्थितीत त्याच्या पत्नीवर बलात्कार केला. धक्कादायक म्हणजे अत्याचाराचा व्हिडीओ चित्रिकरण करुन सोशल मीडियावर सार्वजनिक केल्याचे त्यांनी सांगितले. अत्याचाराचे व्हिडीओ शूट आरोपीने या घटनेचा मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केला. त्यानंतर वारंवार शारिरीक संबंध करण्याची मागणी केली. त्याला पीडितेने विरोध केला. त्यामुळे इम्तियाज हसीन शेख याने ती क्लिप सोशल मीडियावर टाकली. यामुळे ती महिला प्रचंड हादरली. तिला मोठा मानसिक धक्का बसला. शेवटी हिंमत करुन हडपसर पोलीस ठाणे गाठून तक्रार केली. वाचा –
Bharat Gaikwad : ACP ने पत्नी आणि पुतण्याची केली हत्या; मग स्वतःलाही संपवलं, घटनेनं पुणे हादरलं
आरोपीला अटक पोलीस निरीक्षक रवींद्र शेलाके यांनी सांगितले की, महिलेची तक्रार येताच तपास करुन आरोपी याला अटक केली आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवासांची पोलीस कोठडी मिळाली. आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहिता आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button