मनोरंजन

वयाच्या 55व्या वर्षी अक्षय कुमारचं तांडव नृत्य; विक्राळ अन् जटाधारी रुप पाहून प्रेक्षक म्हणाले,…


मुंबई, 28 जुलै : अभिनेता अक्षय कुमारचा OMG 2 हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांआधीच रिलीज झाला. त्यानंतर सिनेमातील दोन गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहेत. त्यातील दुसरं गाणं नुकतंच भेटीला आलं आणि अक्षय कुमारच्या चाहत्यांना मोठं सरप्राइज मिळालं. सिनेमातील हर हर महादेव हे गाणं रिलीज झालंय ज्यात अक्षय कुमार भगवान शंकराच्या भुमिकेत दिसत आहे. केवळ शंकराची भुमिका नाही तर अक्षय कुमारनं त्या वेशात शिव तांडव नृत्य देखील केलं. सिनेमातील या नव्या गाण्याला प्रेक्षकांची पसंती मिळाली असून काहीशा पॉझिटिव्ह कमेंट्स गाण्यावर पाहायला मिळत आहेत. मागील काही सिनेमांचा विचार केला असता अक्षय कुमारचे बरचसे सिनेमे फ्लॉप झाले. सिनेमातील त्याच्या भुमिकांमुळे त्याला प्रचंड ट्रोलिंगचाही सामना करावा लागाला.  मात्र OMG 2च्या वेळी अक्षय कुमारला पॉझिटिव्ह प्रतिक्रिया मिळताना दिसत आहे. हर हर महादेव या गाण्यामध्ये अक्षय कुमार भगवान शंकराच्या विक्राळ आणि जटाधारी रुपात तांडव नृत्य करताना दिसतोय. हेही वाचा – 
Dhanush Birthday : कधी काळी टॅक्सी ड्राइव्हर म्हणून उडवायचे अभिनेता धनुषची खिल्ली; आज करतोय साऊथ सिनेसृष्टीवर राज्य


News18लोकमत

हर हर महादेव हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून प्रेक्षाकांच्या उत्तम प्रतिसाद गाण्याला मिळाला आहे. “बॉलिवूडकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं पण अक्षय कुमारकडे नाही” असं म्हणत चाहत्यांनी अक्षय कुमारचं कौतुक केलं आहे. तसंच “वयाच्या 55 व्या वर्षी तांडव नृत्य करणं सोप्प नाही”, “हे गाणं शिव भक्तांसाठी पर्वणी आहे”, अनेकांनी गाणं पाहून “आमच्या अंगावर रोमांच उभे राहिले” असंही म्हटलं आहे.

हर हर महादेव हे विक्रम मोंट्रोस यांनी गायलं आहे तर त्याचे लिरिक्स शिखर अस्तित्व यांनी लिहिले आहेत. गाण्याची कोरिओग्राफी गणेश आचार्य यांनी केली आहे. तर संपूर्ण सिनेमाचं लेखन आणि दिग्दर्शन अमित रॉय यांनी केलंय. OMG2 हा OMG चा सिक्वेल आहे. OMG2 मध्ये अभिनेता अक्षय कुमारसह पंकज त्रिपाठी आणि अभिनेत्री यामी गौतमी प्रमुख भुमिकेत आहेत. सिनेमा 11 ऑगस्टला रिलीज होणार आहे. तर दुसरीकडे गदर 2 देखील त्याच दिवशी रिलीज होणार आहे. दोन्ही सिक्वेल सिनेमे 11 ऑगस्ट रोजी क्लॉश होणार आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button