Manoj Jarange Protest Mumbai Riot Plot Shahaji Bapu Allegation | मनोज जरांगेंचे आंदोलन बदनाम…

मनोज जरांगे पाटील यांचे आंदोलन मुंबईत पोहोचल्यावर दुर्दैवाने काही लोकांनी मुंबईत दंगली घडवण्याचा डाव आखला होता. मुख्यमंत्र्यांनी तातडीने दंगलीसाठी रसद पुरवणाऱ्यांची सखोल चौकशी करत कारवाई करण्याची मागणी शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू गायकवाड यां
.
शहाजी बापू म्हणाले, दंगली घडवण्याचा प्रयत्न असला तरी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला न्याय देत ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता हा प्रश्न सोडवल्याने विरोध करणारे नेते तोंडावर पडले. या आंदोलनाला ज्यांनी भाजी भाकरी व चांगली रसद पुरवली त्यांना यश आले आणि ज्यांनी दंगली घडवण्यासाठी रसद पुरवली ते तोंडावर पडले, असा टोला शहाजी बापू यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांच्यावर टोला लगावताना शहाजी बापू म्हणाले, संजय राऊतांचा जळफळाट सुरू असून ते वाटच बघत होते, कधी दंगल पेटती आणि हे सरकार अडचणीत येते. मराठा आंदोलन मुंबईत आल्यावर संपूर्ण मुंबईकर विविध पद्धतीची मदत मराठा आंदोलकांना देत असताना लालबागच्या राजाच्या गणपती समोर सुरू असलेली जेवण कोणी बंद केली याचे उत्तर राऊत यांनी द्यावे, असा सवालही शहाजी बापू यांनी केला आहे.
महायुती सरकारमधील देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी मिळून हा प्रश्न अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळला. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा मार्ग सुकर केला. हे आंदोलन यशस्वी झाले. दुर्दैवाने कपटनीती करणाऱ्या लोकांना यातून राजकारणाची स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न केला होता, ते सर्व लोक आज या ठिकाणी उघडे पडले आहेत, माझे स्पष्ट मत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी याची सखोल चौकशी करून यामध्ये कोण समाजकंटक होते आणि या मराठा आंदोलनाला दंगल घडवून मनोज जरांगे यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत होते, ते शोधून काढावे, अशी मागणी शहाजी बापू यांनी केला आहे.
पुढे बोलताना शहाजी बापू म्हणाले, मराठा आंदोलनात रसद पुरवणारा प्रामाणिक वर्ग ही होता, आणि रसद पुरवून दंगल घडवणारा दुसरा एक वर्ग होता. त्यामुळे प्रामाणिकपणाने ज्यांनी भाजी भाकरी आंदोलकांना पुरवली. त्या भाजी भाकरीला यश आले आणि ज्यांनी दंगल घडवण्यासाठी रसद पुरवली होती. ते सगळे उघडे पडले. जे सुरुवातीला अनेक नेते आहेत, नाव घेण्यात अर्थ नाही ते महाविकास आघाडीचे नेते आहेत, मोठ्या घराण्यातील मोठे आणि तरुण काही मंडळी आहेत, ज्यांनी कारण नसताना राजकारणात या आंदोलनाचा फायदा उचलण्याचा प्रयत्न केला. दुर्दैवाने त्यांनी तरी असे करायला नको होते, असे मला वाटते, असेही शहाजी बापू यांनी म्हटले आहे.