ना अक्षय, ना सलमान, 23 वर्षांपूर्वी एका नवख्या जोडीवर निर्मात्यांनी खर्च केले तब्बल 10 कोटी;…

मुंबई, 27 जुलै – हिंदी फिल्म इंडस्ट्री म्हणजेच बॉलिवूडसाठी 1990चं दशक केवळ प्रेक्षकांसाठीच नव्हे, तर त्यात काम करणाऱ्यांसाठीसुद्धा विशेष ठरलं. त्या काळात बॉलिवूडने एवढे मोठे स्टार्स दिले, की त्यांचं नाव हे इंडस्ट्रीत चलनी नाणं झालं. सिनेमाची कहाणी काहीही असली, तरी हे कलाकार सिनेमात असले पुरे, तो सिनेमा हिट व्हायचा. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, अजय देवगण, आमीर खान हे त्यापैकी काही कलाकार. या कलाकारांनी केवळ 90च्या दशकात नव्हे, तर त्यानंतरच्या काळातही रसिकांच्या मनावर राज्य केलं. 90चं दशक संपल्यानंतर बॉलिवूडमध्ये एका नव्या कलाकाराने पाऊल ठेवलं. त्या काळात काही लाखांत सिनेमा तयार व्हायचा, तेव्हा एका सिनेमासाठी निर्मात्यांनी तब्बल 10 कोटी रुपये खर्च केले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या सिनेमाचे हिरो-हिरोइन म्हणजे दोन्ही मुख्य कलाकार नवखे होते. त्या सिनेमातून ते सिनेसृष्टीत पदार्पण करणार होते. यशराज फिल्म्सने सिनेमाची निर्मिती केली होती, तर दिग्दर्शक होते राकेश रोशन. 2000 सालच्या या चित्रपटातल्या डेब्यू कलाकारांवर यशराज फिल्म्सने भरवसा दाखवला आणि 10 कोटी रुपये त्यासाठी खर्च केले. वाचा-
निर्मात्यांचा हा भरवसा सार्थ ठरला. या सिनेमाने सारे विक्रम मोडले. त्या काळी एखाद्या सिनेमाने 20-30 कोटी रुपयांचा गल्ला जमवला, तरी ती मोठी गोष्ट मानली जाते. त्या वेळी या सिनेमाने तब्बल 80 कोटी रुपयांचा बिझनेस केला. त्या सिनेमाची गोष्ट आणि गाणी यांनी रसिकांच्या मनावर राज्य केलं आणि अनेक वर्षं तो प्रभाव कायम राहिला. अक्षय कुमार, सलमान खान यांसारख्या बड्या स्टार्सचाही प्रेक्षकांना जणू विसर पडला होता.
नवोदित कलाकारांना घेऊन केलेल्या सिनेमाला एवढं प्रचंड यश मिळेल असं खुद्द निर्माते-दिग्दर्शकांनाही वाटलं नव्हतं. त्या सिनेमाचं नाव तुम्ही ओळखलं असेलच. त्याचं नाव होतं ‘कहो ना… प्यार है.’ या सिनेमातून हृतिक रोशन आणि अमीषा पटेल यांनी पदार्पण केलं होतं. दोघांची जोडी सुपरहिट ठरली होती. त्यानंतर त्यांनी केलेला ‘आप मुझे अच्छे लगने लगे’ हा सिनेमा मात्र बॉक्स ऑफिसवर हिट होऊ शकला नाही.
त्यानंतर हृतिक रोशनने मागे वळून पाहिलंच नाही. कोई मिल गया, क्रिश, धूम, सुर 30 असे अनेक हिट सिनेमे त्याच्या नावावर जमा झाले. आज 90च्या दशकातल्या कलाकारांएवढंच मानधन हृतिक रोशनही घेतो. अमीषा पटेलचं करिअर मात्र तितकंसं हिट झालं नाही. ‘गदर 2’ या आगामी सिनेमाकडून मात्र तिला खूप अपेक्षा आहेत.