Ex-Deputy Sarpanch Suicide, Dancer Arrested, Video Surfaces | गेवराईच्या उपसरपंचाची आत्महत्या:…

बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (34) यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कला केंद्रातील एका नर्तिकेच्या प्रेमात अडकलेल्या गोविंद यांनी तिच्या घरासमोर गाडीमध्ये स्वतःवर गोळी झाडून जीवन संपवले.
.
गोविंद बर्गे यांच्या आत्महत्येच्या घटनेनंतर पूजा गायकवाडचा एक इंस्टाग्राम व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती एका ऑडिओवर अभिनय करताना दिसत आहे, ज्यात ‘मला या माणसाची विचित्र सवय लागली आहे, हा माझ्या आयुष्यातून गेला तर फार अवघड होईल’ असे बोलले आहे. तिच्या एका हातात 500 रुपयांची नोट आणि चार बोटांमध्ये सोन्याच्या अंगठ्या दिसत आहेत. ही क्लिप आता या प्रकरणाच्या संदर्भात पाहिली जात आहे.
भावाच्या नावावर 5 एकर शेती करण्याचा तगादा
ओळखीचा फायदा घेऊन प्रेमसंबध ठेऊन वेळोवेळी पैसे, सोने लुबाडले. दिलेल्या पैशातून मावशी व नातेवाईकांच्या नावावर प्लॉट जमीन घेतली. तरीही भावाच्या नावावर 5 एकर शेती करावी किंवा गेवराईतील नवीन घर माझ्या नावावर कर नाहीतर तुझ्यावर दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड (21, रा. सासुरे ता. बार्शी, जि. सोलापूर ) हिने वारंवार तगादा लावला. त्यामुळेच गोविंदने आत्महत्या केल्याची तक्रार पोलिसांत देण्यात आली.
दुष्कर्माचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन पैशासाठी नर्तिका पूजा देविदास गायकवाड (21, रा. सासुरे ता. बार्शी जि सोलापूर) हिने वारंवार तगादा लावल्याची तक्रार गोविंद यांचे मेहुणे लक्ष्मण जगन्नाथ चव्हाण (रा .नंदापूर, जि . जालना) यांनी वैराग पोलिसांत फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल झाला असून तिला ताब्यात घेतले आहे.
अशी झाली होती दोघांत ओळख
गोविंदला लोकनाट्य कला केंद्रात कला पाहण्याची आवड होती. दीड वर्षापूर्वी थापडीतांडा कला केंद्रामध्ये पूजा नर्तकीसोबत त्याची ओळख झाली. हळूहळू तिचा प्रवास जसा पारगाव कला केंद्राकडे वळला तसे त्यांच्यातील मैत्रीचे संबंध प्रेमामध्ये गुंफल्याचे सांगण्यात येते. सोन्याच्या दागिन्यांसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा 1 मोबाइलदेखील नर्तकीला भेट दिला होता. अलिकडे तिने गोविंदशी संपर्क तोडल्यामुळे तो नैराश्यात होता. अनेकदा संपर्क साधण्याचा तो प्रयत्न करत असे. मात्र, पूजा प्रतिसाद देत नव्हती. गोविंद सासुरे येथे सोमवारी मध्यरात्री आला. मंगळवारी कारमध्ये स्टिअरिंगवर मृतावस्थेत आढळला.