अपराध

डमी ग्राहक पाठवल्याने स्पा सेंटरचं पितळ उघड; बीडमधून मुंबईतील 3 तरुणींची सुटका

सुरेश जाधव, प्रतिनिधी बीड, 25 जुलै : गेल्या काही दिवसांपासून बीड शहरात अवैध व्यवसाय वाढल्याचे पाहायला मिळत आहे. अशाच एका व्यवसायाचा पर्दाफाश करण्यात आला आहे. बीड शहरातील गजबजलेल्या भागात स्पा सेंटरच्या नावाखाली कुंटणखाणा चालविणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. याच ठिकाणी धाड मारून 3 अविवाहित मुलींची सुटका करण्यात आली. तसेच मालकासह व्यवस्थापकाविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड शहरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी डमी ग्राहक पाठवून खात्री केली. यानंतर धाड टाकली असता 3 पीडितांची सुटका करण्यात आली. काय आहे प्रकरण? एका इमारतीत स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय केला जात होता. मंबईच्या अविवाहित मुलींना बीडला आणत त्यांच्याकडून व्यवसाय करून घेतला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यांनी सोमवारी रात्री 8 वाजता अचानक धाड मारून ही कारवाई केली. यातील मालक व व्यवस्थापक दोघेही फरार झाले आहेत. त्यांचा शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही कारवाई पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक श्वेता खाडे, हवालदार आतिष देशमुख, अशोक नामदास, ढगे, संतराम थापडे, तुकाराम कानतोडे, युवराज चव्हाण आदींनी केली. वाचा –
बॉयफ्रेंडला सापाचे विष देऊन मारलं, त्या विषारी गर्लफ्रेंडकडून अटकेनंतर धक्कादायक खुलासा
बीड जिल्ह्यात एकाच दिवशी तीन महिलाचा आत्महत्येचा प्रयत्न विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या तीन महिलांना आज बीड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या तिन्ही महिलांनी विविध कारणावरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येते. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सोनाली गोकुळ धुमाळ (वय 22, रा. गोंदी ता. अंबड) या महिलेने विषारी औषध पिल्याने तिला उपचारार्थ आज सकाळी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याचबरोबर कामखेडा येथील मनिषा अरुण धापसे (वय 35) या महिलेनेही विष प्राशन केल्याने तिला जिल्हा रुग्णालयात अ‍ॅडमिट करण्यात आले. सुनिता कानिफनाथ रानमारे (वय 24) या महिलेने सुद्धा विषारी औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. एका तासाभरात या तिने महिला जिल्हा रुग्णालयामध्ये सकाळी दाखल झाल्या. विविध कौटुंबिक कारणावरून या महिलांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे सांगण्यात येते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button