25 जवान शहीद झालेल्या भयंकर हल्ल्यातील 2 माओवाद्यांचा आत्मसमर्पण –

नक्षली चळवळीतील दोन जहाल नक्षलवाद्यांचा आत्मसमर्पण – नागपूर अपडेट
नागपूर, 25 जुलै: नक्षलवाद हा देशाच्या सुरक्षेसमोरील एक मोठा आव्हान आहे. हजारो निरपराध नागरिकांचा बळी घेणाऱ्या नक्षली चळवळीला नियंत्रणात आणणे हे प्रत्येक सरकारसाठी महत्त्वाचे आहे. दरवर्षी 28 जुलै ते 3 ऑगस्ट दरम्यान नक्षल शहीद सप्ताह साजरा केला जातो.
या सप्ताहाच्या आगोदरच छत्तीसगडमध्ये दोन जहाल नक्षलवाद्यांनी पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे.
आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांची माहिती
-
अडमा जोगा मडावी (वय 26)
-
छत्तीसगड, बिजापूर जिल्ह्यातील जिलोरगडा गावाचा रहिवासी
-
जुलै 2014 मध्ये पामेड एलजीएसमध्ये सदस्य बनला
-
जानेवारी 2021 मध्ये झोन ॲक्शन टीममध्ये बदली
-
8 चकमक्यांमध्ये सहभागी, 5 खुनांसाठी जबाबदार
-
2016-2017 दरम्यान विविध जंगल परिसरातील चकमक्यांमध्ये सहभाग; यात CRPF आणि पोलीस जवान शहीद झाले
-
-
टुगे कारु वड्डे (वय 35)
-
छत्तीसगड, बिजापूर कवंडे गावाचा रहिवासी
-
2012 पासून नक्षलवादी म्हणून सक्रिय
-
आतापर्यंत 6 खुनांचे गुन्हे
-
2022 मध्ये रोड कामावरील 12 वाहनांची जाळपोळ करण्यामध्ये सहभाग
-
छत्तीसगड सरकारने या दोघांवर एकूण ८ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
आत्मसमर्पणाचे स्वागत
पोलीस अधिक्षक नीलोत्पल यांनी आत्मसमर्पित नक्षलवाद्यांना पांढरा दुपट्टा आणि पुष्पगुच्छ देऊन शांततेच्या प्रतीक म्हणून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले.
नक्षली सप्ताह म्हणजे काय?
-
नक्षलवादी या सप्ताहात सरकारी मालमत्ता नष्ट करतात
-
सुरक्षा दलांवर हल्ले करतात
-
निष्पाप नागरिकांना खबरी असल्याच्या संशयावरुन ठार मारतात
-
रस्ते बंद करणे, बंद पुकारणे, धमकावणे
-
ठेकेदारांकडून खंडणी गोळा करणे
या वर्षी आत्मसमर्पणामुळे सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे.