Maharashtra Marathwada Students Exam Fee Waive Demand | विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करा:…

मराठवाड्यात भयंकर अतिवृष्टी झालीय. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरसह बीड, लातूर, धाराशिव, जालनासह इतर जिल्ह्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे शेतीचे अतोनात नुकसान झाले. हे पाहता डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर पर
.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आणि महाविद्यालयीन प्राध्यापक संघटनेने (बामुक्टो) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही मागणी केलीय. ‘बामुक्टो’ने उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आणि राज्याच्या मुख्य सचिवांकडेही हीच मागणी केलीय. आता यावर काय निर्णय होणार, हे पाहावे लागेल.
मुख्यमंत्र्यांना पाठवलेले निवेदन.
विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम
‘बामुक्टो’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक निवेदन पाठवले आहे. त्यात म्हटले आहे की, यंदाच्या मान्सून हंगामात मराठवाडा विभागात जून ते सप्टेंबर २०२५ या कालावधीत साधारणपणे एक हजार मिलीमीटर पेक्षाही अधिकचा पाऊस झाला. आमच्या विद्यापीठ परीक्षेतत्रात येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड व जालना जिल्ह्यातील बहुतांश महसुली मंडळात अतिवृष्टीमुळे भीषण पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. सदरील अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पीके पूर्णपणे पाण्याखाली गेली असून खरीप हंगामातून मिळणारे उत्पन्न बुडाले आहे. त्यामुळे या परिस्थितीचा थेट परिणाम शेतकरी व कामगार कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर झाला आहे.
गांभीर्याने विचार करण्याचे आवाहन
‘बामुक्टो’ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेल्या निवदेनात पुढे म्हटले आहे की, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर विद्यापीठ परीक्षेत्रातील उच्च शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन शिक्षणाचे नियमित खर्च भागविणे अवघड झाले आहे. विशेषतः विद्यापीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या हिवाळी-२०२५ सत्र परीक्षेचे शुल्क भरणे विद्यार्थ्याना शक्य होणार नसून याचा परिणाम त्यांच्या एकूणच शिक्षणावर होणार आहे. उपरोक्त परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून, मराठवाड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे विभागातील अकृषी विद्यापीठे व संलग्न महाविद्यालायतील विद्यार्थ्यांचे पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे विद्यापीठ परीक्षा शुल्क माफ माफ करावे ही नम्र विनंती.’ निवेदनावर ‘बामुक्टो’चे विभागीय अध्यक्ष प्रा. डॉ. बप्पासाहेब मस्के आणि सचिव प्रा. डॉ. मारोती तेगमपुरे यांच्या सह्या आहेत.