Farmers Protest on Funeral Pyres in Hingoli Demanding Loan Waiver and Wet Drought Relief |…

कनेरगावनाका ते जिंतूर मार्गावर हाताळा पाटी येथे क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी व शेतकऱ्यांनी सोमवारी ता. 29 सकाळी दहा वाजल्या पासून चितेवर बसून आंदोलन केले आहे. सरसकट कर्जमाफीसह ओला दुष्काळी जाहिर करण्याच मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलना
.
हिंगोली जिल्ह्यासह राज्यभरात अतिवृष्टी झाली असून यामध्ये पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानंतरही शासनाकडून केवळ पंचनामे करण्याचे सोपस्कार पूर्ण केले जात आहे. शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक अडचण कायम राहणार आहे. हिंगोली जिल्हयातील शेतकऱ्यांना पिक विमा द्यावा या मागणीसाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वीच विमा कंपनीचे कार्यालय फोडले होते.
दरम्यान, शासनाने राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी. ओला दुष्काळ जाहिर करून शेतकऱ्यांना हेक्टरी पंन्नास हजार रुपयांची मदत देण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. या मागणीसाठी कनेरगावनाका ते जिंतूर मार्गावर हाताळा पाटीजवळ पदाधिकारी व शेतकऱ्यांनी चिता रचून आंदोलन केले. यावेळी क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष गजानन कावरखे, नामदेव पतंगे, सखाराम भाकरे, गजानन काळे, प्रविण मते, दीपक सावके, गजानन सावके, विठ्ठल सावके, अशोक कावरखे, राहुल कावरखे, शिवाजी काळे, घनशाम धामणकर, गजानन जाधव यांच्यासह शेतकऱ्यांची उपस्थिती होती.
दरम्यान, सकाळी दहा वाजल्यापासून सुरु झालेले आंदोलन दुपारपर्यंत कायम होते. यावेळी शेतकऱ्यांना शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. जोपर्यंत ओला दुष्काळ, कर्जमाफी व हेक्टरी ५० हजाराची मदत जाहिर होत नाही तोपर्यंत वेळोवेळी आंदोलन केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.