Pune Girl Beaten in Public; Assault CCTV Footage Goes Viral, No FIR Filed Yet | तरुणीला…

एका तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आल्याची संतापजनक घटना पुण्यात घडली आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. ही घटना किरकोळ वादातून झाल्याची माहिती आहे.
.
सध्या महाराष्ट्रासह देशभरात नवरात्रीचा उत्सव सुरू आहे. या अंतर्गत सर्वत्र देवीचा जागर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात एका तरुणीला भररस्त्यात लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली आहे. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. त्यात एक तरुण एका तरुणीला बेदम मारहाण करताना दिसून येत आहे. प्रथम हा तरुण त्या तरुणीच्या कानशिलात मारतो. त्यानंतर तिच्या कंबरेत लाथ घालतो. नंतर सदर तरुणी शांतपणे रस्त्याच्या शेजारी उभ्या असणाऱ्या ऑटोत जाऊन बसते.
पोलिसांत अजूनही तक्रार दाखल नाही
त्यानंतर त्या ऑटोतून बाहेर पडते आणि रस्ता ओलांडते. त्यानंतर ती मध्येच तरत येते. त्यानंतर पुन्हा हा तरूण तिच्या पोटात लाथ घालतो. एका किरकोळ वादातून ही घटना घडल्याचा सांगण्यात येत आहे. यासंबंधीच्या माहितीनुसार, पुणे – सातारा रस्त्यावरील केके मार्केट ते चव्हाण नगर मार्गावर मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास ही घटना घडली. पण पीडित तरुणी कोण? व तिला मारहाण करणारा तरुण कोण? हे अद्याप स्पष्ट झाले नाही. विशेषतः या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पोलिसांतही कोणती तक्रार दाखल झाली नाही. सहकार नगर पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी याची पुष्टी केली. पण या घटनेवर सर्वसामान्य नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
गँगस्टर नीलेश घायवळ परदेशात पळाला
दुसरीकडे, पुण्यातील गँगस्टर नीलेश घायवळ याने कोथरूडमधील गोळीबारानंतर स्वित्झर्लंडला पळून गेल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलिसांनी नीलेश घायवळसह त्याच्या कुटुंबीयांची तथा त्यांच्याशी संबंधित एका व्यावसायिक आस्थापनेची अशी एकूण 10 खाती गोठवली आहे. या बँक खात्यांत जवळपास 38 लाख 26 हजार रुपयांची रोकड जमा असल्याची माहिती पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.
उल्लेखनीय बाब म्हणजे कोथरूड परिसरात काही दिवसांपूर्वी घायवळ टोळीतील गुंडांनी 2 जणांवर हिंसक हल्ला केला होता. या प्रकरणी कोथरूड पोलिस ठाण्यात 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्यात नीलेश घायवळ याचा उल्लेख मुख्य आरोपी म्हणून करण्यात आला होता. या प्रकरणी नीलेश याच्यासह एकूण 10 जणांवर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
हे ही वाचा…
देवेंद्रा अजब तुझे सरकार:शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांचाच खिसा कापला; जिझिया कर लावल्यांचा विरोधकांचा आरोप
मुंबई – अतिवृष्टीमुळे मराठवाड्यासह संपू्र्ण महाराष्ट्रात हाहाकार उडाला आहे. या प्रकरणी शेतकऱ्यांनी मदतीसाठी सरकारकडे डोळे लावलेत. पण आता सरकारने अतिवृष्टीग्रस्तांची म्हणजे शेतकऱ्यांची मदत करण्यासाठी शेतकऱ्यांकडूनच वसुली सुरू करण्याचा अजब निर्णय घेतल्याची माहिती उजेडात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सरकारच्या या निर्णयावर टीकेची झोड उठवली आहे. वाचा सविस्तर