मनोरंजन

बॉलिवूडच्या तिन्ही खाननी नकार दिलेला सिनेमा ठरला सुपरफ्लॉप; प्रसिद्ध अभिनेत्याचं दिग्दर्शन ठरलं…


मुंबई, 26 जुलै : अनेक निर्मात्यांना बॉलिवूडमधील सलमान, शाहरूख आणि आमिर अशा तीन खानबरोबर काम करण्याची उत्सुकता असते. तिन्ही खान एकाच फ्रेममध्ये दिसण्याची त्यांची इच्छा असते. 2002मध्ये आलेल्या ओम जय जगदीश या सिनेमासाठी तिन्ही खान मंडळींना एकत्र काम करण्याची ऑफर दिली होती. अभिनेते अनुपम खेर यांनी सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं. पण बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा फ्लॉप ठरला. या सिनेमानंतर अनुपम खेर यांनी आजवर कोणताही सिनेमा दिग्दर्शित केलेला नाही. अनुपम खेर यांना या सिनेमासाठी तीन भावांची गरज होती. त्यासाठी त्यांनी शाहरूख, सलमान आणि आमिर यांना विचारणी केली होती. मात्र तिघांनी तारखा नाहीत असं सांगत सिनेमा करण्यास नकार दिला होता. बॉलिवूडच्या तिन्ही खान मंडळींनी सिनेमा करण्यास नकार दिल्यानंतर हा सिनेमा अनिल कपूर, फरगीन खान आणि अभिषेक बच्चन यांच्यावर शुट करण्यात आला. सिनेमात शांतीच्या भुमिकेसाठी माधुरी दीक्षितला देखील विचारणा झाली होती. पण माधुरीनं त्यावेळेस अनिल कपूरच्या अपोझिट काम करण्यास नकार दिला. त्यानंतर अभिनेत्री तब्बूला विचारणा करण्याच आली पण अखेर अभिनेत्री महिमा चौधरीनं सिनेमा साइन केला. इतकच नाही तर या सिनेमातून सिंग अदनान सामी एंट्री करणार होता मात्र त्यानंतर हो अन्नू कपूर यांना ऑफर करण्यात आला. हेही वाचा –
18वर्षांनी मोठा बॉयफ्रेंड, 9 वर्षांपासून लिव्ह-इनमध्ये राहतेय अभिनेत्री; कधीकाळी करायची पेट्रोल पंपावर काम
अभिनेते अनुपम खेर हे 2000 साली सिनेमाची कथा घेऊन यशराज स्टुडिओमध्ये गेले. 90च्या दशकात शाहरूख, सलमान आणि आमिर खान सिनेमात असतील तर सिनेमा हिट होतो असं समजलं जायचं. निर्माते देखील सिनेमात पैसे गुंतवण्यात मागे पुढे पाहत नव्हते. दरम्यान यशराज प्रोडक्शनने अनुपम खेर यांच्यासमोर हिट अट ठेवली होती. बॉलिवूडची तिन खान मंडळी सिनेमात असतील तर मी यशराजच्या बॅनरखाली सिनेमा करेन अशी अट त्यांनी ठेवली होती.


News18लोकमत

अनुपम खेर यांचं तिन्ही खान मंडळींबरोबर चांगलं नातं होतं. तिघांबरोबर त्यांनी काम केलं होतं. त्यामुळे आपल्या शब्दावर तिघेही एकत्र एकाच सिनेमात काम करायला तयार होतील असं त्यांना वाटलं होतं. पण तिघांनी तारखांची कारणं देत सिनेमाला नकार दिला. अभिनेत्री राणी मुखर्जी, प्रीति झिंटा या अभिनेत्रींनी देखील हा सिनेमा नकारला. अखेर सिनेमा महिला चौधरी, उर्मिला मातोंडकर आणि तारा शर्मा तसेच अनिल कपूर, फरदीन खान आणि अभिषेक बच्चन अशी स्टारकास्ट घेऊन पूर्ण करण्यात आला. हा सिनेमा 13 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला होता. पण बॉक्स ऑफिसवर सिनेमा तोंडावर आपटला. अनुपम खेर यांच्या दिग्दर्शनाचा चक्का चुर झाला. त्यानंतर अनुपम खेर यांनी दिग्दर्शनला कायमचा रामराम ठोकला.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

  • First Published :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button