महाराष्ट्र

Nashik Police Banner Ban Crime Cases Filed | नाशिकमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तींच्या ‘चमकोगिरी’ला…

नाशिक शहरातील वाहतूक बेटांवर आणि मुख्य चौकांमध्ये दिशादर्शक फलकांसोबत पुन्हा एकदा भडकलेली बॅनरबाजी आणि त्यातून गुन्हेगारी प्रवृत्तींची वाढलेली ‘चमकोगिरी’ लक्षात घेऊन पोलिस आयुक्तालयाने कठोर पाऊले उचलली आहेत. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी शहर बॅनरमु

.

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

या आदेशावरून पोलिसांनी राकेश कोष्टी, गणेश वाघ आणि कुंदन परदेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या तिघांवर सार्वजनिक ठिकाणी विनापरवानगी बॅनर लावून महाराष्ट्र मालमत्ता विद्रूपीकरण प्रतिबंध कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी केलेल्या निरीक्षणानुसार, अंबड भागातील त्रिमूर्ती चौक, दिव्या अॅडलॅब परिसर आणि पवननगर येथे गणेश वाघ आणि राकेश कोष्टी यांचे बॅनर झळकत होते.

विशेष म्हणजे, आरोपी राकेश कोष्टी आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांनी गणेश उर्फ आप्पा सुरेश वाघ, अजय आठवले आणि मंगेश पांजंगे यांच्या विरोधात गुन्हेगारी वर्तनाचे व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडियावर व्हायरल केल्याची तक्रार आहे.

खुनाचा आरोपी आणि राजकीय आशय

पोलिसांच्या माहितीनुसार, राकेश कोष्टी याच्यावर सन 2006 पासून खुनासह विविध गंभीर गुन्हे नोंदले गेले आहेत आणि सध्या तो मध्यवर्ती कारागृहातून जामीनावर बाहेर आहे. त्याने लावलेल्या बॅनरवर राजकीय आशय असून, त्याच्या इन्स्टाग्राम खात्यावर त्याने स्वतःचा उल्लेख “जिल्हाध्यक्ष, भारतीय जनता पार्टीचे माथाडी कामगार आघाडी, नाशिक” असा केला आहे. कोष्टीने इन्स्टाग्रामवर गुन्हेगारी संदर्भातील पोस्ट करून समाजात भय निर्माण केल्याचाही आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींकडून नाशिकमध्ये ‘दहशत’

नाशिक शहर बॅनरमुक्त करण्याच्या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अनेक सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई सुरू केली आहे. यामध्ये, खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झालेला आरोपी कुंदन सुरेश परदेशी याने पंचवटी हद्दीतील मखमलाबाद रोडवरील हनुमानवाडी, ड्रिम कॅसल सिग्नलजवळ स्वतःचे बॅनर लावून दहशत पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे. त्याचप्रमाणे, सराईत गुन्हेगार राकेश कोष्टी आणि गणेश सुरेश वाघ यांनी अंबडमधील महाकाली चौक येथे, तर राकेश सोनार याने सातपूर येथील जाधव कॉलनीतील दत्तमंदिर चौकात अवैधरित्या बॅनरबाजी करून दहशत पसरवल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

सुशांत शांताराम नाठे या सराईताने आडगाव पोलिसांच्या हद्दीतील कोणार्कनगर येथे, तसेच दिनेश जगन जाधव आणि बाळा जगन जाधव यांनी नाशिकरोड पोलिसांच्या हद्दीत स्वतःचे बॅनर लावून मालमत्तेचे विद्रूपीकरण केले आहे. याशिवाय, फर्नाडीसवाडीतील सराईत करण शलपाल पारचे याने रेजिमेंटल प्लाझा कॉर्नरजवळील रिक्षा स्टँडजवळ बॅनर लावून दहशत माजवण्याचा प्रयत्न केला.

अंबड आणि म्हसरुळ परिसरातही अशाच घटना घडल्या आहेत. बाळा मुरलीधर नागरे (रा. नागरे मळा, पिंपळगांव बहुला) या सराईताने 2 सप्टेंबर रोजी म्हाडा कॉलनीतील जाधव संकुल येथे एका फाउंडेशनच्या नावाखाली बॅनर लावून दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. म्हसरुळ हद्दीत अमोल किशोर फल्ले या सराईताने 4 सप्टेंबर रोजी किशोर सूर्यवंशी मार्गावरील ओमकार चौक येथे शुभेच्छांचे बॅनर लावून दहशत पसरवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button