How to prevent cancer with right lifestyle changes , जीवनशैलीच योग्य बदल केल्यास टाळता येईल…

स्तनाचा कर्करोग हा भारतीय महिलांमध्ये झपाट्याने वाढणारा सर्वात मोठ्या प्रमाणात आढळून येणारा कर्करोग आहे.राष्ट्रीय कर्करोग नोंदणी कार्यक्रम (NCRP) आणि संबंधित अहवालांनुसार स्तनाच्या कर्करोगाची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. महिलांमध्ये आढळणाऱ्या एकुण कर्करोगांपैकी सुमारे २६% प्रकरणे केवळ स्तनाच्या कर्करोगाची असतात. 2019ते 2023 या 5 वर्षांत राज्यात स्तन कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत सुमारे 28% नी वाढ झाली आहे.
तज्ज्ञांच्या मते, जीवनशैलीतील सकारात्मक बदलांमुळे स्तनाच्या कर्करोगास कारणीभूत घटकांवर नियंत्रण ठेवता येते. संशोधनातून सिद्ध झाले आहे की, ज्या महिला नियमितपणे शारीरिकरित्या सक्रिय राहतात, त्यांच्यामध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका 10% ते 25% पर्यंत कमी होतो. व्यायामाचा अभाव हे अनेक रोगांचे मूळ कारण आहे. नियमित व्यायाम केल्याने केवळ वजन नियंत्रणात राहत नाही, तर ते हार्मोनची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते आणि शरीरातील रोगप्रतिकारशक्ती वाढवते. तज्ज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, नियमित मध्यम व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये कर्करोगाचा धोका 10% ते 25% पर्यंत कमी होतो.
डॉ ज्योती मेहता सांगतात की, स्तनाचा कर्करोग हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार असला तरी, तो पूर्णपणे अनियंत्रित नाही. योग्य जीवशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींपासून दूर राहिल्यास, आपण या रोगापासून दूर राहू शकतो. मात्र, जीवनशैलीत बदल करण्यासोबतच चाळीशीनंतर नियमितपणे मॅमोग्राफी आणि स्वतः स्तनांची तपासणी करणे आवश्यक आहे. स्तन कर्करोगास प्रतिबंध करण्यासाठी योग्य जीवनशैली हा सर्वात मोठा आणि प्रभावी उपाय आहे, हे प्रत्येक महिलेला माहित असणे गरजेचे आहे.
योग्य जीवनशैलीच्या मदतीने सकस आहार, नियमित व्यायाम आणि वाईट सवयींपासून दूर राहिल्यास, आपण या कर्करोगापासून दूर राहू शकतो. हाच एक सर्वात प्रभावी उपाय आहे.औषधोपचारांपेक्षा प्रतिबंधक उपाय अधिक परिणामकारक ठरतात. दैनंदिन जीवनात लहान पण सातत्यपूर्ण बदल जसे की दररोज चालणे, ताजे आणि घरच्या अन्नाचे सेवन करणे, तणावाचे व्यवस्थापन करणे आणि पुरेशी झोप घेणे हे दीर्घकाळ आरोग्य चांगले राहण्यास मदत करतात. स्तन कर्करोग टाळण्यासाठी “योग्य जीवनशैली” हा सर्वात महत्त्वाचा आणि खात्रीशीर उपाय मानला जातो.