महाराष्ट्र

Congress’ ‘Black Diwali’ agitation in Anjangaon tehsil | काँग्रेसची अंजनगाव तहसीलमध्ये ‘काळी…

अंजनगावसुर्जी येथे तालुका काँग्रेस कमिटी ग्रामीण व शहरीच्या वतीने तहसील कार्यालयात ‘काळी दिवाळी’ आंदोलन करण्यात आले. दिवाळी तोंडावर असतानाही सरकारने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी विशेष पावले न उचलल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

.

या आंदोलनादरम्यान, काँग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्यांनी भाकर, बेसन आणि चटणीचे जेवण घेतले, ज्याला ‘चटणी-भाकरचे जेवन’ असे संबोधले गेले.

काँग्रेसने सरकारच्या भूमिकेविरुद्ध राज्यव्यापी ‘काळी दिवाळी’ आंदोलनाची हाक दिली होती. त्यानुसार अंजनगावसुर्जी येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते.

या आंदोलनात तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रमोद पाटील दाळू, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष प्रदीपभाऊ देशमुख, दर्यापूर विधानसभेचे प्रभारी प्रशांतभाऊ पाचडे, रामेश्वरभाऊ अभ्यंकर, विलासभाऊ पवार, राहुल पाटील, सुधाकर खारोडे, निखिल कोकाटे, अजय डीके, सतीश हाडोळे, राजूशेठ कुरेशी, किस्मत अली, विनय मानकर, हेमंत येवले, नम्मू भाई, कैलास शिरसाट, सुरेंद्र वानखडे, जहीरभाई नजीम खातीब, वसीम खान, निलेश ढगे, गजानन आठवले, देवानंद व्यवहारे, विनंती तायडे, सुनंदा पाखरे, शेतकरी संघटनेचे गजानन पाटील दुधात, श्रीधर धांडे, जमीरभाई, ओम तायडे, मधुकर इंगळे, तेजस अभ्यंकर यांच्यासह अनेक काँग्रेस पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button