‘दिग्दर्शकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार करायला हवा’; प्रसिद्ध मालिकेतील ‘त्या’ सीनवर भडकले…

मुंबई, 28 जुलै : अनेक प्रेक्षक आहेत जे टेलिव्हिजनवरील मालिका आवडीने आणि न चुकता पाहत असतात. प्रत्येक मालिकेची कथा सुरूवातील जशी आहे तशीच ती पुढच्या सहा महिन्यात राहिल हे काही आता सांगता येत नाही. तरी देखील मालिकेतील पात्र, त्यांच्या भुमिकांमुळे प्रेक्षक सातत्यानं मालिका पाहत असतात. असा एक प्रेक्षक वर्ग ठरलेला असतो जो मालिकेत कितीही ट्विस्ट आणि टर्न्स आले तरी मालिका पाहणं सोडत नाही. पण अनेकदा मालिकेत न पटणारे प्रसंग दाखवले जातात आणि अशा वेळी प्रेक्षक वर्ग काही शांत बसत नाही . सोशल मीडियामुळे मालिकेत न पटणारे सीन्स, कथा, पात्र यांच्याबद्दल बोलणं सहज सोपं झालं आहे. अशीच एक मालिका सध्या चांगलीच ट्रोल झाली आहे. ही मालिका म्हणजे ‘अबोली’. स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेच्या अपकमिंग भागाचा प्रोमो रिलीज झाला आहे. ज्यात दाखवलेला सीन पाहून प्रेक्षकवर्ग चांगलाच भडकला आहे. प्रेक्षकांनी थेट मालिकेची आणि दिग्दर्शकाची अक्कल काढली आहे. थेट दिग्दर्शकाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार देण्याची मागणी केली आहे. हेही वाचा –
पाहुण्यांना घरी बोलवायचं आणि तासंतास उपाशी ठेवायचं; प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आरोपावर सईनं दिलं स्पष्टीकरण
अबोली मालिकेची कथा काही दिवसांआधी बदलली आहे. मालिकेत अंकुशचा अपघात होतो आणि तो कुटुंबापासून वेगळा होता. पण अनेक वर्षांनी अंकुश परत येतो मात्र आपल्या कुटुंबाला आणि बायको अबोलीला ओळखत नाही. आपण त्याची पत्नी आहोत हे अंकुशला आठवून देण्यासाठी अबोली जिवाचं रान करत असते. अशातच अबोलीवर हल्ला होतो आणि त्यात तिचा मृत्यू होतो.
News18लोकमत
अबोली मेल्यानंतर अंकुशला त्याचा भुतकाळ थोडाफार आठवू लागतो. पण आता वेळ निघून गेली आहे. अबोली हे जग सोडून गेलेली असते. अबोलीचं पार्थिव चाळीत आणलं जातं. अंत्यसंस्कार करण्याआधी अंकुश अबोलीचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी जातो. “अबोली तू असताना मी तुझा राग केला. पण आता मला वाईट वाटतंय. कदाचित माझं चुकलं मी तुझ्याशी नीट बोलायला हवं होतं”, असं म्हणत अंकुश अबोलीच्या पार्थिवावर हार घालतो आणि रडत रडत तिथून उठत असताना मेलेली अबोली अनाचक त्याचा हात धरते आणि “जे बोलायचं आहे ते आता बोला सर. असही सत्य उद्या सर्वांसमोर येणार आहे”, असं म्हणते. हे पाहून अबोलीच्या अंत्यसंस्कारासाठी आलेले सगळे घाबरतात.
मालिकेतील हा सीन पाहून अनेकांना हसू कोसळलं आहे. या सीनमुळे प्रेक्षकांनी मालिकेच्या दिग्दर्शकाला ट्रोल केला आहे. सिरीयल जत्रा या पेजवरून मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलाय.
या प्रोमोच्या खाली, एका युझरनं लिहिलंय, “डोक फिरलं आहे वाटतं निर्माता दिग्दर्शकाचे? मानवाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा श्वास आणि हृदयाची धडधड थांबते, हा आजपर्यंतचा समज होता समाजाचा. आता मृत्यू झाल्यानंतरही श्वास आणि हृदयाची धडधड चालू असते हा जावई शोध लागला आहे अबोली या मालिकेत. याबद्दल दिग्दर्शकाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सत्कार करायला पाहिजे”.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.