Ravindra Dhangekar Backs Manoj Jarange, Urges Government to Fulfill Maratha Reservation Demands…

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानावर उपोषणाला बसलेले मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला आता राजकीय वाराही लागला आहे. राज्यातील अनेक नेते त्यांची भेट घेण्यासाठी येत असताना, पुण्याचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनीही जरांगेंना पाठिंबा दर्शवला. “म
.
रवींद्र धंगेकर म्हणाले, “मी आमदार असतानाही हाच मुद्दा मांडला होता. सर्वसामान्य लोकांना शिक्षण आणि नोकरीच्या संधी मिळणं ही मोठी गरज आहे. त्यामुळे समाजाला न्याय मिळाला पाहिजे आणि भाकरीही मिळाली पाहिजे.”
मराठा समाज श्रीमंत असल्याचा अनेकांचा समज
रवींद्र धंगेकर पुढे म्हणाले, “मराठा समाज म्हणजे श्रीमंत, असा अनेकांचा समज आहे. पण वास्तव तसे अजिबात नाही. मराठवाड्यातील मराठा समाज अत्यंत पिचलेला आहे. एक महिला मदतीसाठी माझ्याकडे आली होती, तिची फी मी स्वतः भरली होती. इतकी बिकट परिस्थिती आहे. पूर्वीच्या सरकारांनी मराठा समाजासह इतर समाजांना आरक्षण देण्याची आश्वासने दिली होती. आता तेच नेते सत्तेत आहेत, तर त्यांनी दिलेली वचने पूर्ण करावी.”
धंगेकरांचा सरकारला घरचा आहेर
दहा वर्षांपूर्वी जे नेते आरक्षणावरून घोषणा देत होते, त्यांनी आता ते सिद्ध करावे. धनगर समाज आणि मुस्लिम समाजालाही आरक्षणाचे आश्वासन दिलं होते. त्याबाबत काय झाले, हे आजपर्यंत स्पष्ट नाही, असे म्हणत रवींद्र धंगेकर यांनी सरकारला घरचा आहेर दिला.
आंदोलक रिकाम्या हाताने परतणार नाहीत
क्रांती करायला निघालेले हे लोक रिकाम्या हाताने परतणार नाहीत. त्यांना काही मिळो वा न मिळो, पण ते आरक्षण घेऊनच येणार, असा विश्वास देखील धंगेकर यांनी व्यक्त केला.
हे ही वाचा…
मनोज जरांगेंच्या मागण्यांवर कायदेशीर तपास सुरू:राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती, शरद पवार राजकीय पोळी भाजत असल्याचा आरोप
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेले मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांवर सरकार गांभीर्याने विचार करत आहे, असे भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. हैदराबाद आणि सातारा गॅझेटिअरची तातडीने अंमलबजावणी करण्याची जरांगे यांची मागणी असून, त्यातील कायदेशीर त्रुटी तपासण्याचे काम सुरू आहे. यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक झाली, अशी माहिती विखे पाटील यांनी दिली. सविस्तर वाचा…